Coronavirus : राज्यात कोरोनामुळे टेन्शन! मुंबईत अंधेरी, वांद्रे, ग्रँट रोड कोरोनाचा हॉटस्पॉट, रूग्णवाढीमुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर

Coronavirus Updates : देशासह राज्याच कोरोनामुळे चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होते आहे. राज्यात शनिवारी कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. मुंबईतही कोरोनाग्रस्तांची (Mumbai News) संख्या वाढ आहे. 

नेहा चौधरी | Updated: Apr 9, 2023, 08:19 AM IST
Coronavirus : राज्यात कोरोनामुळे टेन्शन! मुंबईत अंधेरी, वांद्रे, ग्रँट रोड कोरोनाचा हॉटस्पॉट, रूग्णवाढीमुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर title=
Coronavirus Updates increased positivity rate delhi mumbai Maharashtra corona case news in marathi

Coronavirus Updates : कोरोनासंदर्भातली (#Coronavirus) महत्वाची बातमी...राज्यात  542 नवीन कोरोना रूग्णांचं निदान झालंय. तर एका कोरोना बाधिताचा मृत्यू झालाय. राज्यात सध्याच्या घडीला 4360 कोरोनाचे ऍक्टिव्ह रूग्ण आहेत. राज्यातील मृत्यूदर 1.82 % इतका आहे. तर पॉझिटिव्हीटी रेट हा  5.63 टक्क्यांवर पोहोचला आहे.  

मुंबईकर काळजी घ्या !

मुंबईकरांची चिंता वाढवणारी कोरोनासंदर्भातील अपडेट आहे. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी दोनशेपार रुग्ण आढळले आहेत. मुंबईत सध्या 1 हजार 385 सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईतल्या 14 रुग्णांना रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यातल्या 7 जण हे ऑक्सिजनवर आहेत. तर दुसरीकडे अंधेरी पूर्व-पश्चिम, वांद्र पश्चिम आणि ग्रँट रोड भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेत. अंधेरी पश्चिममध्ये दोनशेपेक्षा जास्त सक्रीय रुग्ण आहेत. तर इतर ठिकाणी शंभरपेक्षा जास्त सक्रीय रुग्ण आहेत. 

आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

गेल्या काही महिन्यात झपाट्याने वाढणारी कोरोना रूग्णवाढ लक्षात घेता आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. कोरोनावर उपचार करणाऱ्या सर्व रूग्णालयात मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य यंत्रणांनी मॉक ड्रील करुन अर्लट राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सोमवारी 10 आणि मंगळवारी 11 एप्रिलला मॉक ड्रील होणार आहे. (Coronavirus Updates increased positivity rate delhi mumbai Maharashtra corona case news in marathi)

मुंबईतील सर्व खासगी, महापालिका आणि सरकारी रुग्णालयात मॉक ड्रील (Corona Mock Drill) होणार आहे. मुंबईत कोरोनावर उपचार करणारी 33 खासगी रुग्णालये सज्ज आहेत. देशात H3N2 आणि कोरोना दोन्हीचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत, त्यामुळे हे मॉक ड्रील घेण्यात येत आहे. फेब्रुवारीच्या मध्यापासून काही राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ दिसून येतं आहे. तसंच सर्व रुग्णालयांना आता कशा पद्धतीने सज्ज राहावं याची पूर्णपणे माहिती देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. मुंबईतल्या काही खासगी रूग्णालयांनी याआधीही असं मॉक ड्रील घेतलं आहे. 

देशात पुन्हा कोरोनाचा कहर

देशात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. देशातील गेल्या चोवीस तासांचा कोरोनाचा आकडा पाहिल्यावर तर 6 हजार155 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आरोग्या विभाग चिंतेत आहे. तर देशात सक्रीय रुग्णांची संख्या देखील 31 हजारांवर आहे. सध्या पॉझिटिव्हीटी दर हा 5.63 टक्के इतका आहे. आरोग्या मंत्रालयाकडून कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.