कोरोना संकट : लोकांना शाळेत डांबून ठेवले, न्यायालयाची सुमोटो याचिका

लोकांना महापालिका शाळेत डांबून ठेवल्या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे.  

Updated: Apr 4, 2020, 02:24 PM IST
कोरोना संकट : लोकांना शाळेत डांबून ठेवले, न्यायालयाची सुमोटो याचिका  title=
संग्रहित छाया

औरंगाबाद : रस्त्यावरुन पायी जाणाऱ्या लोकांना महापालिका शाळेत डांबून ठेवल्या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे. त्यांना डांबून ठेवताना सोशल डिस्टन्सिंगचा नियम पायदळी तुडवला असल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे.

डांबून ठेवताना सोशल डिस्टन्सिंगचा नियम पायदळी त यामुळे त्यांना संसर्ग होऊ शकतो असेही न्यायालयाने यावेळी म्हटले आहे. सोबत त्यांना पायाभूत सुविधा मिळत नसल्याची दखल ही न्यायालयाने घेतली आहे. या बाबत औरंगाबाद जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठाता याना औरंगाबाद खंडपीठ न्यायालयाने नोटीस बजावली आहे आणि खुलासा करण्यास सांगितले आहे. याबाबत पुढील सुनावणी ८ एप्रिलला होणार आहे.