मुख्यमंत्र्यांबरोबर असलेले 40 आमदार काहीही करू शकतात; काँग्रेसच्या बड्या नेत्याचे वक्तव्य

महाराष्ट्रातील सर्व प्रकल्पांना विद्यमान सरकारनं स्थगिती दिली त्यामुळं विकास तरी कसा होणार असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला. त्यामुळं मुख्यमंत्र्यांसोबतचे 40 आमदार काहीही करू शकतात अर्जुन खोतकरांनी पुढाकार घ्यावा असं म्हणत मिश्किल टीका केली. 

Updated: Dec 11, 2022, 09:07 PM IST
मुख्यमंत्र्यांबरोबर असलेले 40 आमदार काहीही करू शकतात; काँग्रेसच्या बड्या नेत्याचे वक्तव्य title=

नितीश महाजन, झी मीडिया, जालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांच्यासोबत असलेले 40 आमदार काहीही करू शकतात असं म्हणत माजी मंत्री अशोक चव्हाण( Ashok Chavan) राज्य सरकारवर मिश्किल टीका केली आहे. जालना येथील घनसावंगीत सुरु असलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा आज अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते. 

महाराष्ट्रातील सर्व प्रकल्पांना विद्यमान सरकारनं स्थगिती दिली त्यामुळं विकास तरी कसा होणार असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला. त्यामुळं मुख्यमंत्र्यांसोबतचे 40 आमदार काहीही करू शकतात अर्जुन खोतकरांनी पुढाकार घ्यावा असं म्हणत मिश्किल टीका केली. 

राज्यात सध्या टी ट्वींटी मॅच सुरु आहे. राज्यात जे चाललंय तो योग्य नाही. महापुरुषांबद्दल अपमानकारक वक्तव्य केली जात आहेत. त्यामुळं राजकीय लोकांना महापुरुषांबद्दल बोलतांना काळजीपूर्वक बोलावं असं चव्हाण यांनी म्हंटले.  
बाकी सगळं सोडून रेल्वेचे डब्बे तरी उत्तम करावे असे म्हणत रावसाहेब दानवेंवर देखील त्यांनी टीका केली.

महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे.त्यामुळे महाराष्ट्राला मिळणारा निधी आणि केंद्राकडून मिळणारी वागणूक, सत्तेत होणारा बदल तसेच हातात असलेली यामुळे प्रकल्प रखडतात असं देखील अशोक चव्हाण म्हणाले. राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांना केंद्राने मदत करावी असंही ते म्हणाले. राज्यातील अनेक प्रकल्पांना राज्य सरकारने स्थगिती दिलीय अनेक अडचणी वाढणार असल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय.