विधानपरिषदेसाठी अखेर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये आघाडी

सध्या राष्ट्रवादीकडे असलेली परभणीची जागा पुन्हा काँग्रेसला मिळणार आहे.

Updated: May 3, 2018, 12:53 PM IST

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : लातूरची जागा पूर्वी काँग्रेसकडे होती मात्र तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ती जागा आपले बंधू दिलीप देशमुख यांच्यासाठी  घेतली होती, या बदल्यात काँग्रेसकडील परभणीची जागा राष्ट्रवादीला देण्यात आली होती.आता विलासराव देशमुख यांचे बंधू निवडणूक लढवणार नसल्याने राष्ट्रवादीने लातूरच्या जागेवर दावा सांगत काँग्रेसशी चर्चा न करता त्या ठिकाणी रमेश कराड यांचा अर्ज भरला होताकाल रात्री दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होऊन लातूरची जागा राष्ट्रवादीकडे ठेवण्याबाबत निर्णय झाला, तर सध्या राष्ट्रवादीकडे असलेली परभणीची जागा पुन्हा काँग्रेसला मिळणार आहे.