मुंडे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, पक्षाने कारवाई करावी - फडणवीस

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) यांनी निवडणूक आयोगाकडे ( Election Commission) तक्रार केली आहे.  

Updated: Jan 15, 2021, 06:45 PM IST
मुंडे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, पक्षाने कारवाई करावी - फडणवीस  title=

मुंबई / नाशिक : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) यांनी निवडणूक आयोगाकडे ( Election Commission) तक्रार केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दुसरी पत्नी, अपत्य आणि मालमत्तेबाबतची माहिती लपवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तर मुंडे यांच्यावर पक्षाने कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून तक्रार केली आहे. या तक्रारीत धनंजय मुंडे यांनी २०१९च्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात दुसरी पत्नी, अपत्य आणि मालमत्तेबाबतची माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी स्वतः फेसबुक पोस्टवर कबुली दिली आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांच्या पक्षाने याचा विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले. दरम्यान, त्यांनी यावेळी आघाडी सरकारवर टीका केली. प्रत्येकवेळी केंद्रावर आरोप करायचे आणि आपला नाकर्तेपणा लपवायचा अशी राज्यसरकारची भूमिका आहे, असे ते म्हणाले.

यावेळी राज्य सरकारचे डुप्लीकेट काम चालले आहे, अशी टीका केली. ट्विटमध्ये संभाजीनगर म्हणायचे आणि निर्णय घेण्याचा अधिकार असूनही तो घ्यायचा नाही. ही महाविकास आघाडी सरकारची मिलीजुली भगत आहे. कार्यकर्ते येत जात राहतात, सगळेच पक्ष हे करतात, असे फडणवीस म्हणाले.