लाडकी बहीण योजना कधी बंद होणार? मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट, 'हायकोर्टात...'

Ladki Bahin Yojna: काँग्रेसने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारच्या इतर योजनांविरोधात कोर्टात याचिका दाखल केली. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.  

शिवराज यादव | Updated: Aug 31, 2024, 07:42 PM IST
लाडकी बहीण योजना कधी बंद होणार? मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट, 'हायकोर्टात...' title=

Ladki Bahin Yojna: काँग्रेसने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारच्या इतर योजनांविरोधात कोर्टात याचिका दाखल केली. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. नागपूरमध्ये आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दुस-या टप्प्यातील निधी बहीणींच्या खात्यात जमा करण्यास सुरूवात झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आदिती तटकरे उपस्थित होते.

आज 9 ठिकाणी हा कार्यक्रम झाला आहे. आजचा हा कार्यक्रम पाहिला तर राज्यातील नवदुर्गांचा सन्मान आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही अशा भावना एकनाथ शिंदेंनी व्यक्त केल्या. "ही योजना बंद पडावी यासाठी काहीजण जाणीवपूर्वक न्यायालयात जात आहेत. मात्र आम्ही आपली बाजू भक्कमपणे मांडू. या योजनेद्वारे माता भगिनी अर्थव्यवस्थेला चालना देत असून आम्ही या योजनेच्या लाभाची रक्कम पुढे वाढवत जाणार आहोत," असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. 

दरम्यान दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही असा निर्धार केला आहे.  "राजकारणात वेगवेगळे पक्ष असू शकतात. पण लाडकी बहीण योजना बंद करा आणि या योजना सगळ्या बंद करा काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टात गेले आहेत. त्यांनी याचिका दाखल केली आहे. हे अनिल वडपल्लीवार तेच आहेत जे नाना पटोले, विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रमुख होते. सुनील केदार यांचे राईड हँड म्हणून ओळखले जातात. आज त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून या योजनांवर फास पैसा खर्च होतो सांगत बंद करण्याची मागणी केली आहे. तुम्हीच सांगा या योजना बंद करायच्या का?," अशी विचारणा देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित महिलांना केली. 

"राजकारणात वेगवेगळे पक्ष असू शकतात. पण लाडकी बहीण योजना बंद करा आणि या योजना सगळ्या बंद करा काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टात गेले आहेत. त्यांनी याचिका दाखल केली आहे. हे अनिल वडपल्लीवार तेच आहेत जे नाना पटोले, विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रमुख होते. सुनील केदार यांचे राईड हँड म्हणून ओळखले जातात. आज त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून या योजनांवर फास पैसा खर्च होतो सांगत बंद करण्याची मागणी केली आहे. तुम्हीच सांगा या योजना बंद करायच्या का?," अशी विचारणा देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित महिलांना केली. 

पुढे ते म्हणाले, "आमच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मी सांगतो की, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ आहे, हायकोर्टात मोठात मोठा वकील उभा केला तरी आम्हाला या राखीची आण आहे. काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही. त्याकरिता प्रयत्नांची शर्थ करुन हायकोर्टात केस लढू". 

अजित पवार यांनीही यावेळी कोणी मायचा लाल आला तरी योजना बंद पडू देणार नाही असं ठामपणे सांगितलं. फक्त तुम्ही आशीर्वाद द्या आणि पाठीशी उभे राहा असं आवानही त्यांनी जनतेला केलं.