CIDCO Lottery : नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, म्हाडानंतर सिडको काढणार लॉटरी

CIDCO Lottery News :  घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी . आता तुम्हाला नवी मुंबईत हक्काचे घर घेण्रयाचा तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सिडको घरांसाठीची लॉटरी काढणार आहे. सिडको तब्बल 5000 घरे टप्प्यात विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.  

सुरेंद्र गांगण | Updated: May 14, 2023, 03:49 PM IST
CIDCO Lottery : नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, म्हाडानंतर सिडको काढणार लॉटरी title=

CIDCO Lottery News : नवी मुंबईत घर खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला नवी मुंबईत तुमचे हक्काचे घर मिळू शकते, अशी शक्यता आहे. आता सिडको घरांसाठीची लॉटरी काढणार आहे. सिडको तब्बल 5000 घरे टप्प्यात विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घर घेणाऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे.

गेल्या दोन वर्षांत सिडकोने दोन टप्प्यात 25 हजार घरांची योजना राबवली. यापैकी सुमारे सात हजार घरे विविध कारणांमुळे विक्रीविना पडून आहेत. अनेक ग्राहकांनी देयके भरण्यास असमर्थतेमुळे त्यांची काही घरे पुन्हा ताब्यात घेतली आहेत. याबाबत सिडकोने जाहिरातही काढली होती. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आता पुन्हा सिडको घरांसाठी लॉटरी काढत आहे. प्रस्तावित घरे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विकण्याची योजना आहे. 

दरम्यान, नवी मुंबईत गृहसंकुल बांधणार आहे. तसेच ठाण्यात लवकरच सोडत काढण्यात येणार आहे. आता सिडकोने दोन खोल्यांच्या घराचा नवीन पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांत सिडकोने दोन टप्प्यात 25 हजार घरांची योजना राबवली. आता पुन्हा एकदा 5000 घरांची सोडत निघणार असल्याने घरे घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांचे कधी जाहिरात निघणार याची उत्सुकता आहे.

सिडकोची घरे कोठे आहेत?

म्हाडानंतर सिडको आता घरांच्या लॉटरीची जाहिरात काढणार आहे. 5000 घरांची लॉटरी काढण्यासाठी ही सोडत आहे. तसेच  सिडकोचे नियोजन आहे. सिडको  5000 घरे टप्प्यात विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य योजनेसाठी एक स्वतंत्र संगणक प्रणाली तयार केली आहे. ही घरे वाशी , जुईनगर , खारघर मानसरोवर, उलवे, कळंबोली  या ठिकाणी आहेत.

दोन खोल्यांची घरे सिडको बांधणार

Cidco Houses in Navi Mumbai - सिडको नवी मुंबईत गृहसंकुल उभारणार आहे.नावडे नोडमध्ये दोन खोल्यांची घरे सिडको बांधणार आहे. तेव्हा मध्यमवर्गीयांचं घर घेण्याचं स्वप्न साकार होणार आहे.  नावडे या नव्याने विकसित होणाऱ्या नोडमध्ये मध्यमवर्गीयांसाठी स्वतंत्र टाऊनशिप उभारण्याचा प्रस्ताव सिडकोने तयार केला आहे. यंदाच्या वर्षीच या घरांची घोषणा होण्याची शक्यता आहे. ही घरे खासगी विकासकांपेक्षा स्वस्त असतील अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी दिली आहे. त्यामुळे नवी मुंबईत लहान घर घेणाऱ्यांची इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल.

दरम्यान, गेल्या दोन वर्षांत सिडकोने दोन टप्प्यात 25 हजार घरांची योजना राबविली. यापैकी जवळपास सात हजार घरे विविध कारणांमुळे विक्रीविना पडून आहेत. पैसे देऊ न शकल्याने अनेक ग्राहकांनी काही घरे परत केली आहेत.