ICSE Result 2023 : प्रतीक्षा संपली! दहावी, बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार, कुठे आणि कसा पाहाल?

10th, 12th Result 2023 : कौन्सिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ICSE (10वी) आणि ISC (12वी) परीक्षांचे निकाल आज, दुपारी 3 वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल तुम्ही कुठे पाहाल ते जाणून घ्या... 

श्वेता चव्हाण | Updated: May 14, 2023, 10:02 AM IST
ICSE Result 2023 : प्रतीक्षा संपली! दहावी, बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार, कुठे आणि कसा पाहाल? title=
ICSE Result 2023

ICSE Board Result 2023 : गेल्या काही दिवसांपासून कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनस्‌तर्फे (ICSE) घेण्यात येणाऱ्या दहावी परिक्षेच्या निकालबाबत सोशल मीडियावर विविध अफवा पसरविल्या जात होत्या. अखेर या निकालबाबतची प्रतीक्षा संपली असून आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी) परीक्षेचा निकाल आज (14 मे 2023) दुपारी तीन वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. याबाबत सीआयएससीईने (CISC) निकालाबाबतचे स्पष्टीकरण शनिवारी सायंकाळी अधिकृतपणे जाहीर केले.   

ICSE दहावीची परीक्षा 27 फेब्रुवारी ते 29 मार्च या दरम्यान पार पडली. तर ISC (12वी) परीक्षा 13 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत घेण्यात आली. या वर्षी सुमारे अडीच लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दरम्यान आज दुपारी 3 वाजता या विद्यार्थ्यांचा परीक्षेचा निकाल जाहीर होईल. अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त विद्यार्थी एसएमएसद्वारे देखील त्यांचे निकाल पाहू शकतात. तसेच विद्यार्थ्यांना ''https://cisce.org'' आणि ''https://results.cisce.org'' या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे, अशी माहिती सीआयएससीई कडून देण्यात आली आहे. 

ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा 

1. करिअर पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर, Examination वर क्लिक करा.

2. मुख्य मेनू बारवर, ICSE (10वी) वर्ष 2023 चा निकाल पाहण्यासाठी 'ICSE' वर क्लिक करा आणि ISC (12वी) वर्ष 2023 चा निकाल पाहण्यासाठी 'ISC' वर क्लिक करा.

3. ICSE/ISC मेनूमधून 'Reports' वर क्लिक करा.

4. शाळेच्या निकालाची प्रिंट आउट घेण्यासाठी 'Result Tabulation' वर क्लिक करा.

5. काढलेली प्रिंट तपासण्यासाठी ' Comparison Table वर क्लिक करा.

पैसे काढण्याशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी शाळेच्या heIpdeskttZcisce.ora येथे CISCE हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकते. किंवा तुम्ही 1800-203-2414 वर कॉल करू शकता.

विद्यार्थी CISCE वेबसाइट https://cisce.orq किंवा https:llresults.cisce.orq वर भेट देऊन किंवा वेबसाइटद्वारे निकाल पाहू शकतात.

CISCE वेबसाइट डाउनलोड करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

1. ICSE (दहावी) 2023 परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी, Course पर्यायातून ICSE निवडा आणि ISC (दहावी) 2023 परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी Course पर्यायातून ISC निवडा.

2. निकाल पाहण्यासाठी युनिक आयडी, समन्वय क्रमांक आणि Captcha (स्क्रीनरमध्ये दर्शविल्याप्रमाणे) Enter करा.

3. निकालाची काढण्यासाठी Print या बटणावर क्लिक करा