प्रथमेश तावडे / वसई : विरारमध्ये भिक्षा मागणाऱ्या बाल भिकाऱ्यांकडे चक्क चोरीचे १४ महागडे मोबाईल सापडल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. विरार पूर्वेच्या आरजे नाका येथील भिकारी चोरी करत असल्याचा संशय परिसरात राहणाऱ्या दक्ष नागरिकांना आल्याने त्यांनी ते राहत असलेल्या ठिकाणाची तपासणी केली त्यात त्यांना चक्क जमिनीत गाढून ठेवलेले १४ स्मार्ट सापडले.
नागरिकांनी याबाबतची माहिती विरार पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत मोबाईल फोन जप्त केले आहेत. महिनाभर आधी असाच प्रकार नालासोपाऱ्यात उघडकीस आला होता.
वसई विरार शहरातील रस्त्यांवर, गर्दीच्या ठिकाणी तसेच महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांवर हे बाल भिकारी पैशाची मदत मागण्याच्या बहाण्याने गाडीमध्ये हात घालून गाडीतील प्रवासाचे लक्ष नसतात हातचलाखीने वस्तू लंपास करण्यात सक्रिय आहेत. लॉकडाऊननंतर वसई-विरार शहरात अशा बाल भिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
6\