Child Marriage : धक्कादायक! परीक्षा केंद्राऐवजी 10 वीच्या विद्यार्थिनीला जबरदस्तीनं लग्न मंडपात नेले आणि...

 Child Marriage :  दहावीला असलेल्या अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्यात आल्याची धक्कादायक घटना बीडच्या परळी तालुक्यात घडली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Updated: Mar 13, 2023, 08:05 PM IST
Child Marriage : धक्कादायक! परीक्षा केंद्राऐवजी 10 वीच्या विद्यार्थिनीला जबरदस्तीनं लग्न मंडपात नेले आणि... title=

विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड :  राज्यभरात दहावीची परीक्षा (SSC Exam) सुरु आहेत. दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थीनीसह धक्कादायक प्रकार घडला आहे.  दहावीला असलेल्या अल्पवयीन मुलीचा विवाह (Child Marriage) लावण्यात आल्याची धक्कादायक घटना बीडच्या (Beed)परळी तालुक्यात घडली आहे. दहावीचा पेपर असतानाही ही मुलगी विवाह मंडपात दिसली. पेपरला जाऊ न देता जबदरस्तीनं तिला लग्नमंडपात आणण्यात आले. चाईल्ड लाईन बीडच्या कार्यकर्त्यांनी हे प्रकरण समोर आणलं. आता याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

दहावीचा पेपर असताना देखील ही मुलगी परीक्षा केंद्राऐवजी विवाह मंडपात दिसली. या मुलीला पेपरला जाऊ न देता तिचा  विवाह लावण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत विवाह रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र,  विवाह थांबवला  नाही.
बालविवाहाच्या या प्रकरणांमध्ये परळी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातील शासकीय यंत्रणांनी मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचं सांगण्यात येत आहे. चाईल्ड लाईन बीडच्या कार्यकर्त्यांनी हे प्रकरण समोर आणले. मुलीच वय 15 वर्षहोत तर मुलाचं वय 24 वर्ष आहे. 

सरकार आणि प्रशासन बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करत असले तरी आजही सर्रास बालविवाह केले जात आहेत. धक्कादायक म्हणजे आज ज्या मुलीचा विवाह झाला तिला 10 वी चा पेपर द्यायचा होता. मात्र, तिला लग्नाच्या मंडपात नेण्यात आले.  ज्या वयात मुली बोर्डाचे पेपर देऊन मोठं स्वप्न पाहतात त्याच वयात या मुलीला नातेवाईकांनी बोहल्यावर चढवलं. 

नातेवाईक समाज आणि गावातील कर्तव्यदक्ष नागरिकांनीही हा प्रकार उघड केला. नातेवाईक जरी या मुलीच लग्न लावत असले तरी गावातील अनेकांवर बाल विवाह रोखण्यासाठीची जबाबदारी आहे. मात्र, या लोकांनी या कडे  दुर्लक्ष केले. विवाहाच्या वेळी जे लोक हजर होते त्यातील मंडपवाले, साउंड वाले, फोटोग्राफर, आणि नातेवाईकांसह 200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशस्वी होण्याची स्वप्न पाहणाऱ्या या लहान मुलींचे पंख बालवयातच छाटले जात आहेत.

घरी वडिलांचे पार्थिव घरी असताना दिला दहावीचा पेपर

भंडारा जिल्ह्यात ही विदारक घटना घडली आहे. वडिलांचा पार्थिव घरी असताना मुलीने दहावीचं पेपर दिला. लाखांदूर तालुक्यातील सोनी येथील ही घटना घडली. प्राची राधेश्याम सोंदरकर असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू असताना प्राचीची दहावीची परीक्षा सुरु झाली. प्राचीने दहावीच्या परीक्षेची तयारी अविरत सुरु ठेवली होते. 6 मार्च रोजी इंग्रजीच्या पेपरची तयार करत असताना अचानक प्राचीच्या वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त आले. वडीलांच्या मृत्यूची बातमी कानावर पडताच प्राची निशब्द झाली. मात्र, प्राचीने वडिलांच्या मृत्यूचे दु:ख लपवून ठेवत न रडता आपले ध्येय गाठयचा पण केला आणि तिने परीक्षेला जाण्याचा निर्णय घेतला.