तिलारी प्रकल्प संवर्धन आणि राखीव करण्याचा निर्णय - मुख्यमंत्री ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोकण दौऱ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कामे, प्रकल्प आणि विविध योजनांचा आढावा घेतला. 

Updated: Feb 17, 2020, 10:51 PM IST
तिलारी प्रकल्प संवर्धन आणि राखीव करण्याचा निर्णय - मुख्यमंत्री ठाकरे  title=

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोकण दौऱ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कामे, प्रकल्प आणि विविध योजनांचा आढावा घेतला. सिंधुदुर्ग जिल्हा बैठकीत त्यांनी तिलारी प्रकल्प संवर्धन व राखीव करण्याचा निर्णय घेतला. त्याआधी त्यांनी मसुरे (आंगणेवाडी) लघु पाटबंधारे योजनेच्या प्रशासकीय मान्यतेचे पत्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द केले.

तसेच जिल्ह्यांतील रिक्त पदांचा आढावा घेवून ती भरण्याची कार्यवाही करण्याचे व कबुलायतदार आणि आकारीपड जमिनींबाबत एकत्रित बैठक घेवून निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. त्याधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर आंगणे कुटुंबियांच्यावतीने मुख्यमंत्री ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.

तिलारी प्रकल्प संवर्धन आणि राखीव करण्याचा निर्णय - मुख्यमंत्री ठाकरे

लघुपाटबंधारे योजनेअंतर्गत सुमारे २२.१२ कोटी रुपये खर्चाच्या कामाच्या प्रशासकीय मान्यतेचे पत्र पालकमंत्री सामंत यांच्याकडे दिले. यानंतर या कामाच्या कोनशिलाचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

मसुरे, आंगणेवाडी, देऊळवाडा या गावातील लोकांना मुबलक पाणी मिळण्याचा यामुळे मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेचा लाभ परिसरातील गावांना मिळावा यासाठी ५ कोटी रुपयांचा वाढीव निधीही देण्याची मागणी खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली.