नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतलीय. दुपारी साडेतीनच्या सुमारास मुख्यमंत्री संघ मुख्यालयात दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री आणि भागवत यांच्यात सुमारे ४५ मिनिटे चर्चा झाली. या भेटीचा तपशील मात्र समजू शकलेला नाही.
मंगळवारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही सरसंघचालकांची भेट घेतली होती. त्यावेळीही गडकरी आणि सरसंघचालकांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली होती. रविवारी पार पडलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर लगेचच गडकरी आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सरसंघचालकांची भेट घेतलीय. त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय.