भाजीपाल्याचे दर कोसळलेत, टोमेटोला कवडीमोल भाव

सध्या सर्वत्र भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलीये. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव कोसळलेत.  

Updated: Sep 15, 2018, 11:15 PM IST
भाजीपाल्याचे दर कोसळलेत, टोमेटोला कवडीमोल भाव title=
संग्रहित छाया

नांदेड : सध्या सर्वत्र भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलीये. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव कोसळलेत. याचा चांगलाच आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतोय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होताना दिसून येतोय. दरम्यान, बाजारात टोमेटोला १ रुपया भाव मिळत आहे.

जालना जिल्ह्यातील परतूर येथे आठवडी बाजारात असाच प्रकार पाहायला मिळाला. आठवडी बाजारात टोमेटो विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केला. बाजारात टोमेटोला १ रुपया किलो भाव मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी टोमेटो रस्त्यावर फेकले. यामुळे रस्त्यावर टोमॅटोचा लाल चिखल झालेला पाहायला मिळाला.