छत्रपतींच्या कोसळलेल्या पुतळ्यावर इतिहास अभ्यासकांनी नोंदवले होते हे 5 आक्षेप, तेव्हाच गांभीर्याने घेतले असते तर...'

Chhatrapati Shivaji Maharaj Statue: ज्यावेळी हा पुतळा उभारण्यात आला त्याच वेळी  कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी अनेक आक्षेपाचे मुद्दे उपस्थित केले होते.

Pravin Dabholkar | Updated: Aug 27, 2024, 01:34 PM IST
छत्रपतींच्या कोसळलेल्या पुतळ्यावर इतिहास अभ्यासकांनी नोंदवले होते हे 5 आक्षेप, तेव्हाच गांभीर्याने घेतले असते तर...' title=
इतिहास अभ्यासकांनी नोंदवले होते हे 5 आक्षेप

Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवण मधील राजकोट वर उभारलेला शककर्ते शिवाजी महाराजांचा पुतळा पडला.यानंतर राज्यभरातील शिवप्रेमींच्या संतापाचा कडेलोट झालाय. निवडणूकीच्या आधी 'शिवप्रेम' दाखवण्यासाठी घाईत पुतळ्याचे बांधकाम केल्याचा आरोप करण्यात येतोय. यावरुन भाजप सरकारला लक्ष्य केले जात आहे. यानंतर आलेल्या बेजबाबदार वक्तव्यामुळे बोलून राज्यातील सरकारने आणखी रोष ओढवून घेतला आहे. दरम्यान पुतळा कोसळल्याप्रकरणी इतिहास प्रेमी, इतिहास अभ्यासक यांनी संताप व्यक्त केलाय जातोय. त्यांनी यावर आधीच आक्षेप नोंदवला होता. ज्यावेळी हा पुतळा उभारण्यात आला त्याच वेळी  कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी अनेक आक्षेपाचे मुद्दे उपस्थित केले होते. याबद्दल जाणून घेऊया.

काय आहेत 5 आक्षेप?

अस्सल छायाचित्र आणि इतर साहित्याचा अभ्यास केला नाही, त्यामुळे शिवाजी महाराज वाटत नव्हते. जिरे टोप आणि दाडी आहे म्हणजे ते शिवाजी महाराज नाहीत, असा आक्षेप  इंद्रजीत सावंतांनी नोदवला होता. अभ्यास करून शिल्प उभारले नाही, शिल्पशास्त्रानुसार पुतळा उभारला नाही, हा आक्षेप नोंदवला होता. एक दीड फूट मूर्ती बनविण्याचा अनुभव असणाऱ्या शिल्पकाराला हे काम कस काय दिले गेले? देशात अनेक दिग्गज शिल्पकार आहेत मग त्याच शिल्पकार यांनाच हे काम दिले गेले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.  12 डिसेंबर 2023 ला संभाजीराजे यांनी पत्र पाठवून पंतप्रधान यांना कळविले होते.गडकोट हीच शिवाजी महाराज याची ओळख. मग मोठे मोठे पुतळे उभारण्याची स्पर्धा कशाला केली जात आहे. पुतळा उभरायला हरकत नाही, पण मग अभ्यास करून पुतळा उभा करा, असे आवाहन करण्यात आले होते.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

या गंभीर प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'झालेली घटना योग्य नाही, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. तो पुतळा उभारला तेव्हा त्या कार्यक्रमाला आम्हीसुद्धा होतो. हा पुतळा नौदलाकडून उभारला गेला होता, त्याचं डिझाईन नौदलाने तयार केलं होतं,' अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 'मी जिल्हाधिकाऱ्यांशी यासंदर्भात बोललो. त्यांनी मला सांगितलं की, ताशी 45 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता. यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं आहे. उद्या तिथे नौदलाचे अधिकारी येणार आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण घटनास्थळी जात आहेत. नौदलाचे अधिकारी आणि आमचे काही अधिकारी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिमाखात उभा राहील यासाठी उद्या पाहणी करू. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्यदैवत असून हा पुतळा आम्ही तात्काळ उभारू, असे ते म्हणाले. 

केसरकरांचे वादग्रस्त विधान 

"छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला हा अपघात आहे. त्याच पद्धतीने ते घेतलं पाहिजे. कदाचित वाईटातून काही चांगल घडायचं असेल म्हणूनही हा अपघात झाला असेल, असे विधान दिपक केसरकर यांनी केले. या विधानामुळे केसरकरांनी वाद ओढावून घेतला आहे. अपघात कसा घडला याची चौकशी शासन करेल आणि त्यानुसार पुढील कारवाईही केली जाईल.