75 वर्षांच्या वृद्धेची बलात्कार करुन हत्या, चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या तरुणाचे कृत्य

Crime News In Marathi: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर येतेय.  वृद्ध महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 20, 2023, 12:54 PM IST
75 वर्षांच्या वृद्धेची बलात्कार करुन हत्या, चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या तरुणाचे कृत्य title=
chhatrapati sambhaji nagar crime news man raped and killed 75 years old women

विशाल करोले, झी मीडिया

Crime News In Marathi: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत आहे. वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे चोरीच्या उद्देशाने गेलेल्या एका तरुणाने 75 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीला दोन तासांत अटक केली आहे. 

पीडीत वृद्धेच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार, वैजापूर तालुक्यातील लोणी खूर्द येथे चोरीच्या उद्देशाने गेलेल्या एका तरूणांने 75 वर्षीय वृध्द महीलेवर बलात्कार करून गळा आवळून खून केल्याची संतापजनक घटना घडली आहे. गुलाब आबा बेलदार असे आरोपीचे नाव आहे.

वृद्ध महिला घरात एकटी असल्याचे पाहून गुलाब बेलदार चोरीच्या उद्देशाने घरात शिरला. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तो घरात शिरला. तेव्हा महिला एकटीच घरात होती. महिलेने घरात चोर शिरल्याचे पाहताच त्याला विरोध केला. आरडा-ओरडादेखील करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेच्या आवाजाने शेजारी जमा होऊ नये म्हणून त्याने तिचे डोके भितींवर आपटले. त्यामुळं ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर आरोपीने वृद्ध महिलेवर बलात्कार केला त्यानंतर तिचा गळा आवळून खून करण्यात आला. 

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, संतापाचे वातावरण पसरली आहे. या प्रकरणी शिऊर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपीला अटक केली आहे. 

यवतमाळमध्ये चौघांची हत्या

एकाच कुटुंबातील चौघांच्या हत्येने यवतमाळच्या कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेडा हादरला आहे. गोविंदा पवार या जावयाने पत्नीसह सासरा व दोन साळ्यांचा निर्घृण खून केला असून हल्ल्यात सासू देखील गंभीररित्या जखमी झाली आहे. हत्यानंतर आरोपी मुलगा व मुलीला घेऊन पसार झाला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने जावयाने ही हत्या केल्याचे समोर आले आहे.