छगन भुजबळ आज नागपूरमध्ये, राजकीय वर्तुळात उत्सुकता

आज नागपूरमध्ये येत असलेले भुजबळ नेमके काय बोलणार? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Updated: Jul 8, 2018, 08:54 AM IST
छगन भुजबळ आज नागपूरमध्ये, राजकीय वर्तुळात उत्सुकता title=

नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज (रविवार, ७ जुलै) नागपूरमध्ये येणार आहेत. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू असल्याने त्यांच्या आगमनाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलीय.

नव्या आत्मविश्वाने नवा डाव सुरू 

दरम्यान, दिल्लीतील महाराष्ट्र भवनमध्ये झालेल्या कधीत भ्रष्टाचार प्रकरणी भुजबळांवर आरोप झाले होते. त्यामुळे भुजबळ हे गेली सव्वा दोन वर्षे तुरूंगात होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना जामीन मिळाला. जामीन मिळालेले भुजबळ सध्या तुरूंगाबाहेर असून, त्यांनी पुन्हा एकदा नव्या आत्मविश्वाने नवा डाव सुरू केला आहे. याची चुणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे येथील कार्यकर्ता मेळाव्यातील भाषणात दिसली. 

भुजबळ नेमके काय बोलणार? 

दरम्यान, छगन भुजबळ हे झी २४ तासच्या मुक्तचर्चा कार्यक्रमातही आले होते. तेव्हाही त्यांनी विविध प्रश्नांना मनमोकळी पण तितकीच मिश्कील उत्तर दिली होती. त्यामुळे भुजबळ आजही राजकारणात तितकेच आक्रमक आहेत. जेवढे ते तुरूंगात जाण्यापूर्वी होते हे दिसले होते. दरम्यान, आज नागपूरमध्ये येत असलेले भुजबळ नेमके काय बोलणार? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.