चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू... सध्या दिवाळीच्या सलग सुट्यांमुळे हा प्रकल्प पर्यटकांनी फुलून गेला आहे. मात्र समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या दृश्यात पर्यटक ताडोबा प्रकल्पातील नियम धुडकावत असल्याचं स्पष्ट दिसतय. ताडोबातील माया वाघीण म्हणजे वन्यजीव प्रेमींचा आकर्षणाचा केंद्रबिंदू. माया वाघीण आपल्या बछड्यांसह ताडोबात विहार करत असताना तिच्या भ्रमणाचा मार्ग रोखून धरल्याचं या दृश्यात दिसत आहे.
हा प्रकार वन्यजीवप्रेमींना विचलित करणारा असून ताडोबातील व्यवस्थापनाचं मात्र याकडे दुर्लक्ष होतं आहे.
अत्यंत संथगतीनं आपल्या पिलांसह भ्रमण करणाऱ्या वाघिणीच्या पुढे जिप्सी नेत रस्ता रोखल्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओवर प्राणीमित्रांच्या तिखट प्रतिक्रिया यावर उमटत आहेत.
यासोबतच ताडोबातील व्यवस्थापनावर देखील ताशेरे ओढण्यात येत आहेत.