उद्धव ठाकरे यांच्यावर फडणवीस यांचा पलटवार, जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा !

Maharashtra Politics​ News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या बीकेसीतील सभेनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस (BJP Leader Devendra Fadnavis) यांनी ट्विट करत जोरदार पलटवार केला आहे. अरे छट हा तर निघाला... 

Updated: May 15, 2022, 07:19 AM IST
उद्धव ठाकरे यांच्यावर फडणवीस यांचा पलटवार, जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा !   title=

मुंबई : Maharashtra Politics News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या बीकेसीतील सभेनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस (BJP Leader Devendra Fadnavis) यांनी ट्विट करत जोरदार पलटवार केला आहे. अरे छट हा तर निघाला...आणखी एक ‘टोमणे बॉम्ब’... जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा, असे म्हणत ट्विट केले आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेते काय बोलणार याची उत्सुकता आहे. (BJP Leader Devendra Fadnavis criticized CM Uddhav Thackeray by tweeting)

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल मुंबईतील बीकेसीमध्ये जाहीर सभा झाली. या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे,  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप, हिंदुत्व अशा अनेक मुद्द्यांवर परखड टीका करत आपली भूमिका स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर गेल्या काही दिवसांमध्ये केलेल्या टीकेचा देखील उद्धव ठाकरे यांनी समाचार घेत प्रत्युत्तर दिले. या पार्श्वभूमीवर सभा झाल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक ट्वीट करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संघ आणि भाजपवर जोरदार टीका केली. ही टीका भाजप आणि संघाच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे जोरदार प्रत्युत्तर येणार असे संकेत मिळत होते. आता फडणवीस यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम...अरे छट हा तर निघाला...आणखी एक ‘टोमणे बॉम्ब’... जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा !!! असे म्हणत भाजप जोरदार प्रत्युत्तर देणार याचे संकेत दिले आहेत.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे

मुंबईला स्वतंत्र करण्याच्या भाजप नेत्यांच्या भाषेमुळे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव उघड झाला आहे. मात्र तसा प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे तुकडे होतील, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला. भाजपच्या विकृत-विखारी हिंदुत्वामुळे देशाची दुर्दशा झाल्याची टीका त्यांनी केली. शिवसंपर्क अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री ठाकरे यांची सभा काल बीकेसी संकुलातील मैदानावर झाली. या सभेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपचं हिंदुत्व, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा समाचार घेतला. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केल्यास दया माया न दाखवता पळता भुई थोडी करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना दिला. तसंच महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र बसू आणि लोकांच्या हिताची कामे करु, असं आवाहनही त्यांनी विरोधकांना केलं.