पवारांविरोधात पोस्ट करणाऱ्या केतकीवर हल्ला, NCP कार्यकर्त्यांकडून शाई आणि अंडीफेक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्यांनी केतकी चितळेवर (Ketaki Chitale) शाईफेक केली आहे. तसेच केतकीवर अंडीही फेकण्यात आली.

Updated: May 14, 2022, 07:51 PM IST
पवारांविरोधात पोस्ट करणाऱ्या केतकीवर हल्ला, NCP कार्यकर्त्यांकडून शाई आणि अंडीफेक title=

नवी मुंबई : एनसीपीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह  फेसबूक पोस्ट केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री केतकी चितळेवर (Ketaki Chitale) राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हल्ला केला आहे. तसेच शाईफेक अंडीही फेकण्यात आली. कंळबोली पोलीस केतकीला ठाण्याबाहेर आणत होते. यादरम्यान हा सर्व प्रकार घडला. (ncp workers throw ink and eggs on marathi actor ketaki chitale at navi mumbai)

पोलीस केतकीला गाडीत बसवत होते. या दरम्यान आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संधी साधून केतकीवर शाई आणि अंडी फेकली. इतकंच नाही तर तिला मारहाण करण्याचाही प्रयत्न केला.या वेळेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले दिसून आले. 'केतकी चितळे हाय हाय' अशा घोषणाही यावेळेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.

या सर्व गडबडीत केतकी पोलिसांच्या गाडीत बसताना खाली पडली. तसेच शाईफेक केल्यानंतरही केतकी हसत असल्याचं दिसून आलं. दरम्यान आता पोलीस केतकी विरुद्ध काय कारवाई करतात, याकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचं लक्ष लागून राहिलं आहे.