मोठी बातमी । देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

BJP leader Devendra Fadnavis's corona test positive : भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnvis) यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Updated: Jun 5, 2022, 03:52 PM IST
मोठी बातमी । देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण title=

मुंबई : BJP leader Devendra Fadnavis's corona test positive : भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnvis) यांना कोरोनाची लागण झाली आहे. फडणवीसांनी स्वतः ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली आहे. फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर जाणार होते. फडणवीस यांचा सोलापूर दौरा (Solapur Tour) रद्द करण्यात आला आहे. हा दौरा रद्द करण्यात आल्यामुळे फडणवीस मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. त्यांना हा दौरा अचानक का रद्द केला. याची चर्चा होती. आज त्यांनी ट्विट करत कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले.

दरम्यान, माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करुन घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.  फडणवीस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सगळी औषधे घेत आहेत. ते सध्या घरीच आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

त्याआधी लॉकडाऊनच्या काळात फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली होती. लॉकडाऊनमध्ये ते सक्रीय होते. त्यावेळी त्यांना कोरोना झाला होता.