आंबे निर्यातीत क्रांतिकारक बदल, भारतीय आंबे प्रथमच समुद्रमार्गे अमेरिकेला

Indian mangoes first shipped to the US by sea : भारतीय आंबे प्रथमच समुद्रमार्गे अमेरिकेला रवाना झालेत 

Updated: Jun 5, 2022, 12:20 PM IST
आंबे निर्यातीत क्रांतिकारक बदल, भारतीय आंबे प्रथमच समुद्रमार्गे अमेरिकेला title=

मुंबई : Indian mangoes first shipped to the US by sea : भारतीय आंबे प्रथमच समुद्रमार्गे अमेरिकेला रवाना झालेत. भारतीय आंब्याच्या निर्यातीमधील हा ऐतिहासिक क्षण असल्याचं महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने सांगितले. भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, अपेडा आणि सानप ऍग्रो ऍनिमल्स प्रा. लि. यांच्या संयुक्त प्रयत्नांनी हे शक्य झाले आहे. 

समुद्रमार्गे निर्यातीमुळे आंब्याचा वाहतूक खर्च दहा टक्क्यांवर येणार आहे. अमेरिकेतील बाजारपेठेत भारतीय आंबा स्पर्धात्मकरित्या उतरून इतर देशांतील आंब्याशी स्पर्धा यामुळे करु शकणार आहे. 

तसेच समुद्रमार्गे निर्यातीमुळे आंबा जवळपास दीड महिन्याच्या जादा कालावधीसाठी तिथल्या बाजारपेठेत राहील. भारतीय आंब्याच्या इतिहासातील ही अत्यंत महत्त्वाची घटना मानली जातेय. यामुळे आंब्याच्या निर्यातीमध्ये क्रांतिकारक बदल शक्य आहे.