'तुमच्या भ्रमाचो भोपळो भाजपाच्याच टाळक्यावर फुटतलो'

मालवणी भाषेतून आशीष शेलार आणि सचिन सावतं यांच्यात जुंपली, एकमेकांना काढले चिमटे, म्हणाले 'तुमच्या भ्रमाचो भोपळो....'

Updated: Dec 31, 2021, 04:03 PM IST
'तुमच्या भ्रमाचो भोपळो भाजपाच्याच टाळक्यावर फुटतलो' title=

मुंबई : सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा निर्विवाद विजय झाला. त्यानंतर ट्वीटरवरून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी एकमेकांना मालवणीमध्ये चिमटे काढण्याचं सत्र सुरू झालं.  राणे पॅनेलने आपलं वर्चस्व कायम राखतमहाविकास आघाडीला दे धक्का दिला आहे. राणे पॅनलनं 19 जागांपैकी 11 जागांवर विजय मिळवला. 

या निवडणुकीनंतर सिंधुदुर्गात ढोल वाजवून आणि फटाके फोडून जल्लोष पाहायला मिळाला. त्यानंतर ट्वीटरवर आशीष शेलार विरुद्ध सचिन सावंत ट्वीटर वॉर पाहायला मिळालं. आशीष शेलार यांनी सावंत यांना टोमणा मारला आहे. 

काय म्हणाले आशीष शेलार 
'देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्...आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो. 'नवी मुंबई, ठाणे, मुंबई महापालिका निवडणुकींच्या निकालाची ही नांदी आहे. मा. अमितभाई शाह म्हणाले त्याप्रमाणे हिम्मत असेल तर तिघेही एकत्र समोर लढाईला या आम्ही तयार आहोत!'

सचिन सावतं यांचं खास शैलीत मालवणीत प्रत्युत्तर

' शेलारानु, अर्ध्या हळकुंडान पिवळे कित्याक व्हतास? एक खुय जिल्हा बॅंक निवडणूक जिंकलास तरी आमका काय फरक पडाचो नाय. तुमी कितीव हातपाय आपटलास तरी राज्याच्या सत्तेत आमीच आसव! पुढची २५ वर्सा महाविकास आघाडीची सत्ताच रवतली. तुमी वाट बगा. तुमच्या भ्रमाचो भोपळो भाजपाच्याच टाळक्यावर फुटतलो.