'कोरोना व्हायरसवरील प्लाझ्मा थेरेपीत फसवणूक होण्यापासून सावधान'

गृहमंत्री अनिल देशमुखांचा इशारा 

Updated: Jul 13, 2020, 07:04 PM IST
'कोरोना व्हायरसवरील प्लाझ्मा थेरेपीत फसवणूक होण्यापासून सावधान' title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : coronavirus कोरोना व्हायरचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरेपी अतिशय उपयुक्त ठरत आहे. असे असले तरीही या संदर्भातही फसवणूक  होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यापासून सावध राहावे, असे आवाहन  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.  

डॉक्टरांचे सल्ले आणि निरीक्षणावरून  ‘प्लाझ्मा थेरेपी’ कोविड -१ रूग्णांसाठी एक उपचार पद्धती म्हणून उदयास आली आहे. जास्तीत जास्त कोविड रूग्णांना  मदत करण्यासाठी विविध राज्य आणि रुग्णालयांनी 'प्लाझ्मा बँक' आणि प्लाझ्मा देणगी(डोनेशन) मोहीम सुरू केली आहे.  

प्लाझ्मा देणगीदाराच्या कमतरतेमुळे ही थेरेपी महाग आहे. काही निवडक रुग्णालयांत ही उपचार पद्धती करण्यात येत आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत, कोरोनातून बरे झालेले  बेरोजगार तरुण आवश्यकतेनुसार थेट लोकांना प्लाझ्मा दान देताना आढळून आले आहेत.   प्लाझ्मा दान करण्यासाठी कोविडमधून बरे झाल्याचा वैद्यकीय अहवाल आणि प्लाझ्मा दान करण्यास तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.  

गरजू लोकांच्या बिकट परिस्थितीचा फायदा घेत त्यांना फसवण्याचा उद्देशाने बनावट प्रमाणपत्र देखील तयार केली जात आहेत. ही खोटी प्रमाणपत्रे दाखवून लाखो रुपये  गरजू रुग्णांना कडून घेतले जाऊ शकतात. सायबर गुन्हेगार यासाठी समाज माध्यमांवर विविध युक्त्या देखील वापरत आहेत. डार्क वेब आणि बेकायदेशीर वाहिन्यांवर प्लाझ्माची विक्री संदर्भात  फसवणूक होऊ शकते.  त्या विरुद्ध कडक  कारवाई केली जाईलच. पण, तरीही सर्व संबंधित नागरिकांनी या प्लाझ्मा थेरेपी उपचाराबाबत जागरूक रहावे. सावध असावे असा महत्त्वाचा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला. 

 

प्लाझ्मा दाता ऑनलाईन शोधताना काळजी घ्यावी असं सांगत नागरिकांनी कोणत्याही कोविड उपचाराच्या सुरक्षित पद्धतींवरच अवलंबून असले पाहिजे ही महत्त्वाची बाब त्यांनी मांडली. कोविड उपचारांसंदर्भात कोणत्याही प्रकारे फसवणूक होत असेल तर नागरिकांनी नजीकच्या पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी असे आवाहन देशमुख यांनी केले.