LIC ची खात्रीशीर योजना; दररोज 45 रुपये वाचवून शेवटी मिळवा 25 लाख रुपये; गणित अगदी सोपं...

LIC Investment : 45 रुपये तर असे ना तसे कुठेही खर्च केले जातात. हाच वायफळ खर्च थांबवून एकदा या योजनेमध्ये गुंतवणूक करून पाहा. काही वर्षांनंतर तुम्हालाच मिळेल दिलासा...   

सायली पाटील | Updated: Nov 20, 2024, 11:04 AM IST
LIC ची खात्रीशीर योजना; दररोज 45 रुपये वाचवून शेवटी मिळवा 25 लाख रुपये; गणित अगदी सोपं...  title=
LIC Jeevan Anand Scheme benefits and investment details along with financial plannig

LIC Jeevan Anand Investment Plan : नोकरीतून हाती येणारा पगार महिनाअखेरीस इतका तळाशी जातो, की रुपया खर्च करतानाही दोनदा विचार करावा लागतो. विविध कर्जांचे हफ्ते, महिन्याचा खर्च, प्रवासासाठी लागणारी रक्कम, औषधपाणी या आणि अशा कैक गरजांसाठी पगाराची रक्कम खर्च केली जाते. सरतेशेवटी इतक्या मेहनतीनं केलेल्या कमाईतून Saving काहीच झाली नाही, असं म्हणत खंतही व्यक्त केली जाते. 

LIC हीच चिंता मिटवण्यासाठी प्रयत्नशील असून, आता या संस्थेकडून गुंतवणुकीची एक खिशाला परवडणारी आणि आर्थिक बोजा न टाकणारी एक योजना समोर आणण्यात आली आहे. या पॉलिसीचं नाव आहे, LIC जीवन आनंद स्कीम. ही एक अशी योजना आहे, ज्याअंतर्गत दर दिवशी 45 रुपयांची बचत करत अखेरीस गुंतवणुकदारांना 25 लाख रुपयांची मोठी रक्कम परताव्याच्या स्वरुपात मिळणार आहे. 

किमान प्रिमीयममध्ये एक चांगली रक्कम परतावा म्हणून मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी एलआयसीची जीवन आनंद पॉलिसी एक उत्तम पर्याय आहे. ही एक टर्म पॉलिसी असून, यामध्ये एका ठराविक कालावधीपर्यंत गुंतवणूक करणं अपेक्षित असतं. यामध्ये पॉलिसीधारकांना एक नव्हे, अनेक (Maturity Benefits) फायद्यांचा लाभ घेता येतो. या योजनेमध्ये किमान एक लाख रुपयांचं अश्योर्ड सम असून, Maximum Limit निर्धारित करण्यात आलेलं नाही. 

महिन्याचा हिशोब केल्यास या योजनेअंतर्गत प्रतिमहा 1358 रुपये, वर्षाला 16300 रुपये गुंतवले जातात. दर दिवसाचा हिशोब केल्यास 35 वर्षांसाठी दर दिवशी 45 रुपये, अशी आकडेमोड समोर येते. मॅच्योरिटी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदारांना या योजनेतून 25 लाख रुपयांची रक्कम मिळते. 

हेसुद्धा वाचा : 'बाबांनो आनंदी नसाल, तर सुट्टी घ्या...' कोणती कंपनी करतेय कर्मचाऱ्यांचा इतका विचार? 

35 वर्षांसाठी 16300 रुपयांची गुंतवणूक केल्यास एकूण जमा रक्कम होते 5,70,500 रुपये. पॉलिसी टर्मनुसार यामध्ये बेसिक अश्योर्ड सम 5 लाख रुपये असून, शेवटी तुम्हाला 8.60 लाखांचं रिविजनरी बोनस आणि 11.50 लाखांचं फायनल बोनस देऊन एकूण परताव्याची रक्कम दिली जाते. या बोनससाठी तुम्ही पॉलिसीची 15 वर्षे पूर्ण करणं अपेक्षित आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेमध्ये आयकरातून सवलत मिळत नाही. या योजनेअंतर्गत अॅक्सिडेंटल डेथ अँड डिसेबलिटी रायडर, अॅक्सिडेंट बेनिफिट रायडर, न्यू टर्म इंश्योरन्स रायडर आणि न्यू क्रिटिकल बेनिफिट रायडर अशा सवलती मिळतात.