पाकिस्तानी सेलिब्रिटींचे प्रायव्हेट Video Viral! समोर आलं धक्कादायक सत्य; ती म्हणाली, 'माझ्या...'

Pakistani Star Private Video: सध्या पाकिस्तानमध्ये या दोन व्हिडीओंची तुफान चर्चा असली तरी या व्हिडीओंमागील सत्य आता समोर आलं आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात...

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 20, 2024, 10:39 AM IST
पाकिस्तानी सेलिब्रिटींचे प्रायव्हेट Video Viral! समोर आलं धक्कादायक सत्य; ती म्हणाली, 'माझ्या...' title=
दोघींचे व्हिडीओ व्हायरल (फोटो - डावीकडे माथिरा आणि उजवीकडे इन्शा रेहमान सौजन्य - सोशल मीडियावरुन साभार)

Pakistani Star Private Video: सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून पाकिस्तानमधील एका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्युएन्सरच्या नावाने एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल होत आहे. या इन्फ्युएन्सरचं नाव आहे इन्शा रेहमान! इन्शाचा व्हिडीओ असल्याचा दावा करत व्हायरल होत असलेला हा अश्लीलतेकडे झुकणारा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. मात्र हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावरुन इन्शाने आपलं अकाऊंट डिअॅक्टीव्हेट केलं आहे. मात्र यानंतर काही वेळाने अशाच प्रकारचा नवीन वाद निर्माण झाला. पाकिस्तानमधील प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि इन्स्युएन्सर असलेल्या माथिराचा असाच एक कथित खासगी व्हिडीओही व्हायरल झाला. हा व्हिडीओही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 

खासगी क्षण कॅमेरामध्ये कैद झाल्याचा दावा

माथिराचा व्हिडीओ असल्याचा दावा केला जात असलेल्या या व्हिडीओत तिचे काही खासगी क्षण कॅमेरात कैद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र या अभिनेत्रीने हा व्हिडीओ खोटा असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या नावाने व्हायरल होत असलेले फोटो आणि व्हिडीओ खोटे असल्याचं माथिराचं म्हणणं आहे. 

तिने सोशल मीडियावरुन स्पष्टीकरण देताना काय म्हटलं?

माथिराने सोशल मीडियावर यासंदर्भातील स्पष्टीकरण दिलं आहे. माथिराने एक्सवर (आधीच ट्वीटर) एक पोस्ट करताना, "माझ्या नावाचा आणि फोटोंचा लोक गैरवापर करत आहेत. ते खोटी माहिती पसरवत आहेत. थोडी तरी लाज बाळगा. मला या साऱ्या गोंधळात खेचू नका," असं म्हटलं आहे.

अनेकांनी या व्हिडीओवरुन केली टीका, म्हणाले बदनाम करण्याचा कट

माथिरा आणि इन्शाच्या या कथित व्हिडीओंची सत्यता पडताळून पाहण्यात आलेली नाही. मात्र या प्रकरणांमुळे पुन्हा एकदा बेकायदेशीरपणे खासगी माहिती ऑनलाइन व्हायरल होण्याचा विषय चर्चेत आला असून याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. माथिराच्या अनेक समर्थकांनी पुढे येत तिची पाठराखण केली आहे. अनेकांनी असे व्हिडीओ आणि फोटो माथिराची बदनामी करण्याच्या उद्देशाने व्हायरल केले जात असल्याचा आरोप केला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावरुन प्रसिद्ध झालेल्या महिलांना अशाप्रकारे व्हिडीओ आणि खासगी फोटोंशी छेडछाड करुन त्रास देण्याचे प्रकार पाकिस्तानमध्ये मागील काही काळात वाढले असून हे धोकादायक असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. या प्रकरणांमुळे खासगी डेटा किती सुरक्षित आहे याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. अनेकांनी असा खोटी माहिती व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.