मुंबई : Bank Strike: देशातील बँका 4 दिवस बँका बंद राहणार आहेत. बँकेचे कर्मचारी 28 - 29 तारखेला संपावर जाणार आहेत. त्याआधी शनिवार, रविवारची सुट्टी असेल. त्यामुळे बँका सलग शनिवार पासून सलग 4 दिवस बंद असणार आहे. केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाला विरोध म्हणून हा संप पुकारण्यात येणार आहे.
इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ने सांगितले की, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA), बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया (BEFI) आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (AIBOA) यांनी देशव्यापी संपावर जाण्याबाबत नोटीस दिली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहिती दिली की, 'संपाच्या दरम्यान, एसबीआयच्या कार्यालयांचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी आवश्यक त्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. परंतु संपामुळे बँकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.'