बाबा सिद्धीकी अजित पवार यांच्या संपर्कात? काँग्रेस पक्षाची साथ सोडणार

मुंबईत मिलिंद देवरांपाठोपाठ काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे.  झिशान सिद्धीकी, बाबा सिद्धीकी पितापुत्र अजित पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती  सूत्रांकडून मिळाली आहे.

Updated: Feb 1, 2024, 11:02 PM IST
बाबा सिद्धीकी अजित पवार यांच्या संपर्कात? काँग्रेस पक्षाची साथ सोडणार title=

Baba Siddique : मुंबईत काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांच्या पाठोपाठ बाबा सिद्धीकी, झिशान सिद्धीकी हे पितापुत्र राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.  

बाबा सिद्धीकी काँग्रेस पक्षाची साथ सोडण्याची शक्यता आहे. मिलींद देवरा यांच्यानंतर बाबा सिद्धिकी अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  मिलींद देवरा यांच्यानंतर बाबा सिद्धीकी अजित पवार यांच्या संपर्कात असल्याने काँग्रेस पक्षाला धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.  मी इतर पक्षात जाण्याचा तुर्तास कोणताच निर्णय घेतलेला नाही. जर काही घडत असेल तर अधिकृत सांगू अशी प्रतिक्रिया बाबा सिद्धीकी यांनी दिली आहे.

कोण आहेत बाबा सिद्धीकी?

बाबा सिद्दीकी हे मुंबईतील सर्वात चर्चेत असणारे नेते आहेत. बाबा सिद्दीकी दरवर्षी मुंबईत इफ्तार पार्टीचे आयोजन करत असतात. त्यांच्या या  इफ्तार पार्टीला बॉलिवूडचे सुपरस्टार आवर्जुन हजेरी लावतात. सिद्दीकी हे मुंबईतील वांद्रे पश्चिम मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार राहिले आहेत.

मिलींद देवरा यांनी का सोडली काँग्रेस पक्षाची साथ

मिलींद देवरा यांनी पक्ष सोडू नये यासाठी काँग्रेसनं त्यांना दोन जागांचा पर्याय दिला होता अशी माहिती सूत्रांनी दिली. देवरांना काँग्रेसनं दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर मध्य लोकसभा जागा पैंकी एक जागेवरून निवडणूक लढवण्याचा पर्याय दिला होता अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र मिलींद देवरा दक्षिण मुंबईच्या जागेसाठी आग्रही असल्यानं पक्षात मनभेद झाले आणि त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. 

उद्धव ठाकरेंना कोकण दौ-याच्या पहिल्याच दिवशी  भाजपचा जोरदार धक्का

उद्धव ठाकरेंना कोकण दौ-याच्या पहिल्याच दिवशी भाजपनं जोरदार धक्का दिलाय.  तब्बल 25 वर्षे आमदार असलेल्या सूर्यकांत दळवींनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केलाय.  बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत असलेले दळवींनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दळवींनी भाजपमध्ये प्रवेश केला.