'हल्दीराम' कंपनीचा मुद्दा विधानसभेत गाजला, पुन्हा तपासणीचे आश्वासन

  येथील हल्दीराम या खाद्यपदार्थ उत्पादक कंपनीत काही खाद्यपदार्थांचे नमुने अप्रमाणित आढळून आल्यानंतरही याप्रकरणी दंडात्मक कारवाई  न करता संबंधितांची निर्दोष सुटका केल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची पुन्हा तपासणी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानपरिषदमध्ये जाहीर केलं.

Updated: Dec 19, 2017, 02:55 PM IST
'हल्दीराम' कंपनीचा मुद्दा विधानसभेत गाजला, पुन्हा तपासणीचे आश्वासन title=

नागपूर :  येथील हल्दीराम या खाद्यपदार्थ उत्पादक कंपनीत काही खाद्यपदार्थांचे नमुने अप्रमाणित आढळून आल्यानंतरही याप्रकरणी दंडात्मक कारवाई  न करता संबंधितांची निर्दोष सुटका केल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची पुन्हा तपासणी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानपरिषदमध्ये जाहीर केलं.

हल्दीराम कंपनीवर कठोर कारवाई न केल्याचा मुद्दा विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्षवेधी प्रश्नाच्या माध्यमातून उपस्थित केला होता. या प्रकरणात  दिरंगाई केल्याचं आढळलं तर संबंधितांवर निश्चीत कारवाई केली जाईल ,कोणत्याही अधिकाऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही, अशी ग्वाही अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानपरिषदेत दिली.

अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या दक्षता पथकामार्फत या प्रकरणाची चौकशी करून येत्या तीन महिन्यात अहवाल सादर केला जाईल असं सांगतानाच भेसळयुक्त पदार्थ सहन केला जाणार नाही असं ते म्हणाले. या प्रकरणात दिरंगाईबाबत विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत चौकशी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं .