दीपक भातुले, झी मीडिया, मुंबई : राज्यातील कोरोना निर्बंधातून (Maharashtra relaxation of lockdown restrictions) आणखी सूट मिळणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलयं. राज्यात निर्बंध आहेत तसेच ठेवायचे की, त्यात आणखी सूट द्यायची, याबाबतचा अंतिम निर्णय हा स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबतची (Task force) बैठक पार पडली आहे. मुख्यमंत्री सध्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबच चर्चा करत आहेत. या बैठकीनंतर स्वत: मुख्यमंत्री निर्णय जाहीर करतील. (Attention to Chief Minister Uddhav Thackeray's decision on whether there will be more relief from the lockdown restrictions in Maharashtra)
'या' निर्णयांकडे लक्ष
राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट हा एक टक्क्यांपेक्षा कमी आहे, तेथील दुकानांमध्ये वेळेत वाढ, तसेच उपाहारगृहांच्या वेळेत वाढ केली जाऊ शकते. राज्यात एकूण 15 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर एक टक्क्यापेक्षा कमी आहे. त्यामध्ये परभणी, बुलडाणा, धुळे, नांदेड, हिंगोली, अमरावती, वाशिम, वर्धा, नंदुरबार, जालना, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा आणि नागपूरचा समावेश आहे.