Breaking : 'महापुरुषांचा अपमान होतो...' नागपूर विधानभवनासमोर तरुणीचा आत्महदहनाचा प्रयत्न

महापुरुषांचा अपमान होतो, वारकरी संप्रदायाचा अपमान होतो अशा घोषणा तरुणीचा आत्मदहनाचा प्रयत्न, तरुणीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Updated: Dec 23, 2022, 03:21 PM IST
Breaking : 'महापुरुषांचा अपमान होतो...' नागपूर विधानभवनासमोर तरुणीचा आत्महदहनाचा प्रयत्न title=

Maharashtra Winter Session 2022 : आताची एक मोठी बातमी. नागपुरात विधानभवनाच्या (Nagpur Vidhan Bhavan) मुख्य दारासमोर एका 28 वर्षी तरुणीने स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी वेळीच थांबवल्यामुळे पुढचा अनर्थ टळला. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचे नाव कविता चव्हाण असून ती सोलापूरची आहे.. महापुरुषांचा अपमान होतो, वारकरी संप्रदायाचा अपमान होतो अशा घोषणा करत तिने आत्मदहनाचा प्रयत्न केला. सध्या तिला पुढील चौकशीसाठी सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं आहे.