राणेंचा 'स्वाभिमान' भाजपमध्ये विलिन होणार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश

कोकणातील ज्येष्ठ नेते नारायण राणे हे आज आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलिन करणार आहेत.

Updated: Oct 15, 2019, 07:54 AM IST
राणेंचा 'स्वाभिमान' भाजपमध्ये विलिन होणार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश title=
फोटो सौजन्य : ट्विटर

कणकवली : कोकणातील ज्येष्ठ नेते नारायण राणे हे आज आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलिन करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कणकवलीत होणाऱ्या सभेत नारायण राणे यांच्यासह नितेश राणे, निलेश राणे आणि स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते अधिकृतपणे भाजपाचे सदस्य होतील. यातील नितेश राणे यांनी यापूर्वीच भाजपात प्रवेश केला आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री ज्या कणकवलीत ही सभा घेणार आहेत, त्याच मतदारसंघातून नितेश राणे हे भाजपाचे उमेदवार आहेत तर शिवसेनेनेदेखील आपला उमेदवार या मतदारसंघातून उभा केला आहे. कणकवलीमधून सतिश सावंत यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. सतिश सावंत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे उद्या कणकवलीत सभा घेणार आहोत.

कणकवलीमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात आपण शिवसेनेविरुद्ध काहीही बोलणार नाही. तसंच आता राणेंनीही शिवसेनेसोबतची कटुता संपवावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'झी २४ तास' ला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटलं होतं. तसंच मुख्यमंत्र्यांचं ऐकून आपण एक पाऊल पुढे टाकत आहोत. आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची इच्छा असल्याची प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली होती.