अनिल परब यांच्या अडचणीत वाढ, मुरुड ग्रामपंचायतीकडून ईडीने काही कादपत्रे घेतली ताब्यात

Anil Parab Issue : ED seized some documents : शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीमधील मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत आता मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.  

Updated: May 28, 2022, 10:48 AM IST
अनिल परब यांच्या अडचणीत वाढ, मुरुड ग्रामपंचायतीकडून ईडीने काही कादपत्रे घेतली ताब्यात title=

रत्नागिरी : Anil Parab Issue : ED seized some documents : शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीमधील मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत आता मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीने दापोलीतील मुरुड ग्रामपंचायतीमधून अनिल परब यांच्या व्यवहाराबाबतचे काही कागदपत्रांच्या नकला घेतल्या आहेत. त्यामुळे आता ईडीच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. (ED has seized some documents from Murud Gram Panchayat in the name of Anil Parab.)

ईडीचे पथक दापोलीत दुसऱ्यांदा दाखल झाले. ईडीच्या पथकाने मुरुड ग्रामपंचायतीमध्ये जाऊन घेतल्या कागदोपत्री अधिकृत नक्कला घेतल्या आहेत. रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित मालममत्तांची चौकशी ईडीने सुरु केली आहे. गुरुवारी ईडीचे पथक मुरुड येथे दाखल झाले आहे. दुसऱ्या दिवशीही दापोली मुरुड येथेच हे पथक थांबले होते. 

मुरुड ग्रामपंचायतीकडून अनिल परब यांच्या नावे असलेल्या काही कागदपत्रांच्या नक्कला ईडीने ताब्यात घेतल्या आहेत. रितसर अर्ज करुन मुरुड ग्रामपंचायत कार्यलयात जाऊन ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती शुक्रवारी दुपारी घेतली आहे. यामध्ये एसीसमेंट उतारा, कर आकारणी आदी कागदपत्रे यांचा समावेश आहे.  दरम्यान या सगळ्या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत काही कागदपत्रे सादर केली आहेत.

 मुरुड ग्रामपंचायतकडून करण्यात आलेली आकारणी यासाठी असलेला परब यांचा अर्ज आदी कागदोपत्र या सगळ्याच्या प्रती अधिकृतपणे ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्या आहेत.  त्यामुळे आता एकंदरच या प्रकरणाची उत्सुकता वाढली आहे. हे पथक शुक्रवारी दुपारनंतर परत मुंबईत गेले अथवा नाही याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.      

दरम्यान, अनिल परब यांची चौकशी अंमलबजावणी संचालनालय (ED) यांच्याकडून सुरु असली तरी अद्याप कोणताही ठोस पुरावा हाती लगला किंवा कसे याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया ईडीकडून आलेली नाही.  या सगळ्या पार्श्वभूमीवर दापोली येथील अनिल परब समर्थक 11 जून रोजी पालकमंत्री अनिल परब दापोली दौऱ्यावर येत आहेत, अशी माहिती परब समर्थकांकडून दिली जात आहे. मात्र आता दापोली शहरात अनिल परब कोणत्या विकासकामांची भूमिपूजन अथवा उद्घाटन करणार याचीही उत्सुकता अनेकांना आहे.

साई रिसॉर्ट प्रकरणी चौकशी सुरु झाल्याने हा विषय अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा ठरला आहे. पण या रिसॉर्ट जवळ आपला कोणताही सबंध नाही, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमधील दोन मंत्री ईडीच्या कारवाईनंतर तुरुंगात आहेत. त्यामुळे आता नंबर अनिल परब यांचा त्यानी आता कपडयाची बॅग भरायला घ्यावी, असा थेट आरोप भाजप नेते किरीट सोमय्या सांगत आहेत. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणातील चौकशीची उत्सुकता लागून राहिली आहे.