Anganwadi Bharti 2023 : अंगणवाडी सेविकांबाबत मोठी बातमी, पगारवाढीसह होणार भरती

Anganwadi Bharti 2023 : अंगणवाडीचा प्रश्न सोडविण्यात येणार आहे. 20 हजार अंगणवाडी सेविका भरती करणार आहोत. याच अधिवेशनात वेतनाचा प्रश्नमार्गी लागेल, अशी माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. दरम्यान, अंगणवाडी सेविका वेतन वाढीसाठी विरोधकांकडून आंदोलन सुरु करण्यात आले आहे. 15000 हजार रुपये पगारवाढ करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.

Updated: Mar 3, 2023, 01:45 PM IST
Anganwadi Bharti 2023 : अंगणवाडी सेविकांबाबत मोठी बातमी, पगारवाढीसह होणार भरती title=

Anganwadi Bharti : अंगणवाडी सेविकांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. (Anganwadi salary issues )अंगणवाडी सेविकांबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मोठी माहिती दिली आहे. (Maharashtra Anganwadi Bharti 2023 ) अंगणवाडी सेविका मानधन वाढ अर्थसंकल्प अधिवेशनात होईल, असे ते म्हणाले. 20 टक्के पगार वाढ केली जाणार आहे. तसेच मे महिन्यापर्यंत 20 हजार अंगणवाडी सेविका भरती करणार आहोत, अशी त्यांनी माहिती दिली. दरम्यान, अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरुच आहे. मानधनात वाढ करण्याची त्यांची मागणी कायम आहे. 

अंगणवाडी सेविकांबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी माहिती देताना सांगितले की, 20 टक्के पगार वाढ केली जाणार आहे. तसेच मे महिन्यापर्यंत 20 हजार अंगणवाडी सेविका भरती करणार आहोत. तसेच  अंगणवाडी सेविका यांच्यासाठी मोबाईल खरेदी करण्साचा 150 कोटी खर्च केले जाणार आहे. तर मनपा क्षेत्रात 200 कंटेनर अंगणवाडी सेविका सुरु करत आहोत. अंगणवाडी भाड्डेदर वाढवला जाणार आहे, अशी माहिती लोढा यांनी दिली. तर अंगणवाडी सेविका वेतन वाढीसाठी विरोधकांकडून आंदोलन सुरु करण्यात आले आहे. 15000 हजार रुपये पगारवाढ करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.

अंगणवाडी प्रश्नी सरकार गंभीर नाही - धनंजय मुंडे

आज प्रश्नोतरच्या तासात अंगणवाडी सेविकांचा विषय होता. जवळपास 100 सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. या विभागाचे मंत्री उत्तर देत होते तेव्हा सगळेच  म्हणत होते उत्तर व्यवस्थित दिलंच नाही. या सरकारची भूमिका योग्य नाही. 100 सदस्य प्रश्न उपस्थित करून देखील मंत्री बघू बघू म्हणत असतील हे योग्य नाही.ज्या घोषणा तोंडी केल्या जातायत मात्र सरकार अंमलबजावणी करत नाहीत, असा हल्लाबोल माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. तसेच अंगणवाडी सेविका विषयी प्रश्न विचारला तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलतील असे सांगत असतील तर असे मंत्री कश्याला पाहिजे, अशी टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.

मंत्री लोढा यांच्याकडून थातूर मातूर उत्तर - पाटील

अंगणवाडी सेविका आणि मदतीनीस यांचा प्रश्न विधानभवनात मंडण्यात आला. मात्र मंत्री लोढा यांच्याकडून थातूर मातूर उत्तर देण्यात आली. राज्याच्या अधिकार मंत्र्यांना नसेल तर मंत्री असताना उत्तर देता येत नसेल तरी ते योग्य नाही. उद्या येणाऱ्या अर्थसंकल्पत काहीतरी थाथुर मथुर उत्तर दिलं जाईल. पण आमची मागणी आहे आताच यावर दिलं पाहिजे. आम्ही हा प्रश्न लावून धरला पण त्यांनी आम्हाला व्यवस्थित उत्तर दिलेलं नाही. म्हनून आम्ही सभात्याग केला आहे, अशी माहिती माजी मंत्री जयंत पाटील यांनी दिली.