अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे 11 दिवसांच्या बाळाचा मृत्यू!

रात्री उशिरा यातील एका बालकाचा मृत्यू झाला आहे.

Updated: Sep 26, 2022, 08:59 AM IST
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे 11 दिवसांच्या बाळाचा मृत्यू! title=

अमरावती : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात एसएनसीयू विभागात रविवारी आग लागल्याची घटना घडली. मुख्य म्हणजे व्हेंटिलेटरच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचं समोर आलं. मात्र या आगीमध्ये एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना देखील समोर आली आहे. आग लागल्याची बाब लक्षात येताच तातडीने एसएनसीयू विभागातील नवजात शिशूंना इतर ठिकाणी हलवण्यात आलं होतं. मात्र रात्री उशिरा यातील एका बालकाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा तिथे 12 नवजात बाळं होती. यातील दोन बाळं ही आधीच व्हेंटिलेटरवर असल्याने त्यांची प्रकृती गंभीर होती. अमरावतीच्या रूग्णालयामध्ये उपचारादरम्यान काल रात्री यातील एका बाळाचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेत 11 दिवसाच्या नवजात बाळाचा मृत्यू झालाय. काल सकाळी अमरावती शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयात एका व्हेंटिलेटरने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. तातडीने बाळांना दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. पण, आगीने ICU वॉर्ड मध्ये धुराचं वातावरण निर्माण झाल्याने रुग्णालयात शिफ्ट केलेल्या एका नवजात बाळाचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळच्या सुमारास शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील बालकांच्या अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्कीटनं आग लागल्याची माहिती मिळाली होती. या घटनेनं रुग्णालय परिसरात मोठी खळबळ उडाली.