Amol Kolhe | खासदार अमोल कोल्हेंचा आत्मक्लेश, नथुरामची भूमिका ही चूकच

'व्हाय आय किल्ड गांधी' या (Why i Kiiled Gandi) सिनेमात 'नथुराम'ची भूमिका साकारल्याने खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांच्यावर टीका करण्यात आली.  

Updated: Jan 30, 2022, 05:46 PM IST
Amol Kolhe | खासदार अमोल कोल्हेंचा आत्मक्लेश, नथुरामची भूमिका ही चूकच  title=
प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे : 'व्हाय आय किल्ड गांधी' या (Why i Kiiled Gandi) सिनेमात 'नथुराम'ची भूमिका साकारल्याने खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांच्यावर टीका करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकरणाऱ्या अमोल कोल्हेंनी नथुरामची भूमिका साकारणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया सर्वसामांन्यामधून उमटत होती. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही अमोल कोल्हेंवर टीका करत घरचा आहेर दिला होता. मात्र यानंतरही अमोल कोल्हे हे त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. मात्र असं काय झालं की त्यांनी आत्मक्लेश केला. नक्की काय झालं हे आपण जाणून घेऊयात. (amol kolhe repented after followers expressed displeasure over the role of nathuram Godse)

खासदार कोल्हे यांनी महात्मा गांधी पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला इंद्रायणी घाटावर यांनी आत्मक्लेश केला. यावेळेस त्यांनी स्पष्टीकरण दिलं. नक्की अमोल कोल्हे काय म्हणाले हे आपण जाणून घेऊयात.

कोल्हे काय म्हणाले? 

"आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत पाहिलं आहे. आम्ही तुम्हाला शिवाजी महाराज म्हणून स्वीकारलं आहे. यानंतर तुम्हाला अशा भूमिकेत पाहणं आवडलं नाही, असं अनेकांनी खासगीत सांगितंल. यामुळे अनेकांमध्ये नाराजी व्यक्त केली", असं अमोल कोल्हे यांनी नमूद केलं.

"तसंच या भूमिकेमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्याकडून 2017 मध्ये जी गोष्ट झाली त्याबाबत मी दिलगिर आहे", अशी ही प्रतिक्रिया कोल्हे यांनी दिली.