'जयला कुणी मारहाण केली, CCTV तपासा'; मनसे कार्यकर्त्याच्या नातेवाईकांची मागणी

Akola MNS Worker Death Case​: अकोल्यात मनसे कार्यकर्ता जय मालोकार याची हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. जयच्या कुटुंबियांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 31, 2024, 01:05 PM IST
'जयला कुणी मारहाण केली, CCTV तपासा'; मनसे कार्यकर्त्याच्या नातेवाईकांची मागणी  title=

Akola MNS Worker Death Case​: अकोल्यात मनसे कार्यकर्ता जय मालोकार याची हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.  मंगळवारी राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये राडा झाला. अमोल मिटकर यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. याप्रकरणातील 11 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे. यामध्ये जय मालोकारचा देखील समावेश आहे. जयच्या नातेवाईकांनी त्याच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

मंगळवार अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या 11 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये जय मालोकार यांचाही समावेश होता. या हल्ल्यानंतर सर्व मनसे कार्यकर्ते पसार झाले होते. सायंकाळी अचानक जय मालोकार यांना हृदयविकाराचा झटका आला आणि यात त्यांचा निधन झालं. हा संपूर्ण प्रकार धक्कादायक आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी मालोकार कुटुंबांनी केली आहे. 

नातेवाईकांची मागणी 

जय मालोकार यांच्या निधनानंतर त्यांच्या नातेवाईकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे. त्यामध्ये  जय मालोकार यांना कोणी धक्काबुक्की केली मारहाण केली याचा सर्व तपास करून न्याय मिळावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. 26 वर्षाचा तरुण असा अचानक निघून गेल्याने कुटुंबियांसाठी हा सर्वात मोठा धक्का बसला आहे. तसेच आतापर्यंत मनसेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी किंवा नेत्यांनी कुटुंबीयाशी संपर्क साधला नसल्याचही जय मालोकार यांच्या मोठ्या भावाने म्हटलं आहे.

(हे पण वाचा -'राज ठाकरेंनी मुंबईसोडून...' कार फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्याच्या निधनानंतर अमोल मिटकरी म्हणाले...) 

आदित्य ठाकरे भेटीला 

मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांचा नाशिकचा दौरा रद्द करण्यात आला आहे. अकोल्यामध्ये मनसैनिक जय मालोकार याच्या मृत्यूमुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे. मालोकार कुटुंबियाची भेट घेण्यासाठी अमित ठाकरे अकोल्याला जाण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे. 

अमोल मिटकरी काय म्हणाले? 

अमोल मिटकरी म्हणाले की, 26 वर्षांचा एक युवक , कुणाच्या तरी चिथावणीनंतर या राड्यात गेला आणि नंतर त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तो तरुणही पक्षाचं काम करत होता. पण एक अभ्यास करणारा तरुण अशा पद्धकतीने जातो याचं वाईट वाटतं. या सगळ्या प्रकरणात मला काही झालं असतं, तर माझं कुटूंब उघड्यावर पडलं असतं. तेव्हा यांनी काय केलं असतं? मिटकरींना या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. एका कष्ट करणाऱ्या घरातील मुलगा गेलाय. मी देखील त्या कुटुंबाची भेट घेईन, असा शब्द मिटकरींनी दिला. माझी मनसे पक्षप्रमुखांना विनंती आहे की, त्यांनी मुंबई सोडून इथं यावं.