तिच्या Resume मध्ये लिहिलं होतं डान्स आवडतो, मग काय ऑफिस टीम मिटींगमध्ये तिने...'हा' Video पाहिला का?

Viral Video : सोशल मीडियावर ऑफिस मीटिंगमधील तरुणीचा एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. जर तुम्हाला वाटत असेल मीटिंगमध्ये वाद विवाद, कंपनीच्या प्रगतीसाठी रणनिती आखली जात असणार, पण नाही...तर या व्हिडीओमध्ये एक तरुणी...

नेहा चौधरी | Updated: Jul 31, 2024, 11:50 AM IST
तिच्या Resume मध्ये लिहिलं होतं डान्स आवडतो, मग काय ऑफिस टीम मिटींगमध्ये तिने...'हा' Video पाहिला का? title=
pune woman dance at office meeting video viral On social media

Viral Video : सोशल मीडियावर क्षणा क्षणाला असंख्य व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ नेटकऱ्यांच लक्ष वेधन्यात यशस्वी होतात. त्या व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्ह्यूज आणि लाइक्स मिळतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये असतो. सध्या सोशल मीडियावर ऑफिस मीटिंगमध्ये तरुणीचा एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. तुम्हाला वाटत असेल ऑफिस मीटिंगमधील व्हिडीओ म्हणजे टीम मेंबरमधील वाद, कंपनीची रणनिती किंवा काही तरी मजेदार कृत्य असेल. पण नाही हा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आवडेल. 

नोकरी करायची म्हटल की, मुलाखत आणि त्यासाठी लागतो Resume लागतो. या Resume मध्ये आपण काय काय शिकलो आहोत. आपलं कुटुंब पार्श्वभूमी आणि आपले छंद त्यात लिहिलेले असतात. बस मग काय जेव्हा ऑफिसमध्ये टीम मीटिंग सुरु झाली. त्यानंतर वरिष्ठांना आठवतं की, तुम्हाला कुठल्या छंदाची आवड आहे. ते झालं असं की, या व्हिडीओमधील तरुणीने तिच्या Resume मध्ये डान्सची आवडत असल्याच लिहिलं होतं. त्यामुळे टीम मीटिंगमध्ये विरंगुळा किंवा अजून काही माहिती नाही. पण या तरुणीला डान्स करायला सांगितला जातो. 

हो, अगदी बरोबर ही तरुणी टीम मीटिंगमध्ये डान्स करताना दिसून आली. या तरुणीचा डान्स सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांना खूप आवडतोय. तरुणीने सोनम कपूरच्या भाग मिल्खा भाग या चित्रपटातील ‘ओ रंगरेझ’ या गाण्यावर डान्स करुन सर्वांना आश्चर्यचकित केलं. हा व्हिडीओ पुण्यातील असल्याच बोलं जातंय. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. अनेक लोक या तरुणीचं आणि तिच्या आत्मविश्वासाचं कौतुक करत आहेत. काही लोक तर असेच काही तरी आपल्या कार्यालयात असावं अशी प्रतिक्रिया देत आहेत. 

तर एका यूजर्सने लिहिलंय की, 'कार्यालय हे कामाचे ठिकाण आहे, नृत्यासाठी नाही.' मात्र या महिलेने आपल्या नृत्याने सर्वांचं मनोरंजन केलं असं असंख्य यूजर्स म्हणत आहेत. आणखी एका युजरने लिहिलंय की, वाढीसाठी निन्जा तंत्र, पण मी फक्त बारातमध्ये नागिन म्युझिकवर डान्स करतो. अजून एका वापरकर्त्याने लिहिलंय की, 'ऑफिसच्या मीटिंगमध्ये ऑफिसच्या लोकांसमोर हे करायला हिंमत लागते.'