भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे नागपुरात पोस्टर्स, 'वचनाचा पक्का, हुकूमाचा एक्का'

Ajit Pawar Banner in Nagpur : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स नागपुरात झळकले आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे बॅनर्स लावले आहेत. 

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 26, 2023, 10:44 AM IST
भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे नागपुरात पोस्टर्स, 'वचनाचा पक्का, हुकूमाचा एक्का' title=

सुशांत पाटील / नागपूर : भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे पोस्टर्स नागपुरात ( Ajit Pawar Banner in Nagpur ) झळकले आहे. वचनाचा पक्का हुकूमाचा एक्का, मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादा पक्का! असा आशय असलेले हे बॅनर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. राज्याची उपराजधानी नागपुरात लक्ष्मी भुवन चौकात राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे बॅनर्स लावले आहेत. 

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कार्यकर्ते नेत्याचे मनात आपलं स्थान निर्माण व्हाव आणि आपल्याकडे लक्ष वेधलं जावं, यासाठी नवनवीन शक्कल लढवत असतात. अशातच सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे होर्डिंग लावण्याचा सपाटा सुरु आहे. आपलाच नेता कसा मुख्यमंत्री पदासाठी योग्य आहे. हे दाखवणारे बॅनर साधता लावले जातात आहे. 

 मलाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटतंय; अजित पवार यांच्या सासुरवाडीत बॅनर लागल्यावर काँग्रेस आमदाराचे वक्तव्य

उपराजधानी नागपूरात लक्ष्मी भुवन चौकात राष्ट्रवादीच्या नेते असलेलं प्रशांत पवार यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून अजित दादाच पोस्टर लावले आहे. ''वचनाचा पक्का हुकूमाचा एक्का मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादा पक्का'' अशा आशयाचा हे होर्डिंग लावून लक्ष वेधलं आहे.  दरम्यान, बुट्टीबोरी येथे अशाच स्वरुपाचे भावी मुख्यमंत्री म्हणून सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच पोस्टर भाजपचे नेते बबलू गौतम यांनी लावले. मात्र, त्यांना चमकोगिरी महागात पडली आणि काही तासातच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सूचना देताच पोस्टर काढण्याची वेळ आली.

दरम्यान, पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत विचारण्यात आले. त्यावेळी मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे म्हटले होते. त्यानंतर मुख्यमंत्री पदाची चर्चा जोर धरु लागली. सध्या राज्याचे राजकारण हे मुख्यमंत्रीपद या एकाच विषयाभोवती फिरताना दिसत आहे. यामुळे चर्चेच आहेत ते विरोधी पक्ष नेते अजित पवार. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. थेट  सासुरवाडीतच अजित पवार यांचे बॅनर झळकले आहेत. धाराशीवमधल्या तेर गावात भावी मुख्यमंत्री म्हणून चक्क अजित पवारांचे पोस्टर झळकले आहेत. 

अजितदादा यांनी मुख्यमंत्री पदाची  इच्छा बोलून काय दाखवली, त्यांच्या सासरची मंडळी आतापासूनच कामाला लागली आहेत.  'तेरचे जावई, आमचे नेते जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख असलेले मोठमोठाले बॅनर त्यांच्या सासरवाडीतल्या चौकाचौकात झळकले आहेत. विशेष म्हणजे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांचेही फोटो बॅनरवर आहेत.