Ajit Pawar : संघाच्या मैदानात अजित पवार दक्ष असल्याचं समोर आलंय.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतीभवनास भेट दिली... मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र तेथे जाणं टाळलंय... नागपूरमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमानंतर फडणवीस आणि शिंदे यांनी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरूजी यांच्या समाधी स्थळाला भेट देत वंदन केलं...मात्र अजित पवारांनी समाधीस्थळाकडे जाणं टाळलंय...
अजित पवारांना सोबत घेऊन भाजपाने स्वतःची किंमत केली, अशा प्रकारची टीका संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या साप्ताहिकातून करण्यात आली होती. त्यानंतर संघाशी संबंधित 'विवेक' साप्ताहिकांतूनही अजित पवारांवर टीका करण्यात आली होती. त्यामुळेच अजित पवार संघाच्या माजी प्रमुखांच्या समाधीस्थळावर न जाता थेट निघून गेले.
गेले काही महिने महायुतीमधल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून अजित पवारांवर टीका केली जातेय.. मात्र यावरुनच अजित पवारांनी आता जोरदार पलटवार केला.शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या विधानाला अखेर अजित पवारांनीच प्रत्युत्तर दिलंय.. कोणी काही बोलल्याने अंगाला भोकं पडणार नाही अशा शब्दात अजित पवारांनी तानाजी सावंत यांना सुनावलंय.
अजित पवारांनी पहिल्यांदाच भाजप आणि शिवसेनेकडून होणा-या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय.. आज जरी मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर येऊन उलट्या होतात, असं वादग्रस्त विधान तानाजी सावंतांनी केलं होतं. तानाजी सावंत यांनी केलेलं हे विधान अजित पवारांच्या पक्षाच्या चांगलंच जिव्हारी लागलंय.. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यावर सडकून टीका केलीय.. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तानाजी सावंत यांना समज द्यावी अशी मागणी मंत्री हसन मुश्रीफांनी केलीय.. तानाजी सावंत फक्त अजित पवारांवरच वादग्रस्त विधान करुन थांबले नाहीत.. तर एका कार्यक्रमात एका शेतक-याचीही त्यांनी लायकी काढल्याचा आरोप करण्यात येतोय..
आधी अजित पवारांबाबत विधान.. त्यानंतर शेतक-यावर केलेल्या तानाजी सावंत यांनी केलेल्या अरेरावीची दखल मुख्यमंत्र्यांनीही घेतली आहे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तानाजी सावंत यांच्यावर नाराज असल्याचं समजतंय.. रामदास कदम, आनंदराव अडसूळ, दीपक केसरकर यांच्यासारख्या नेत्यांनी याआधी वादग्रस्त विधानं करत वाद ओढवून घेतले होते. त्यात आता तानाजी सावंत यांची भर पडलीय. त्यामुळे वादग्रस्त विधानं करणा-या आपल्याच नेत्यांना आवरण्याचं आव्हान मुख्यमंत्र्यांसमोर आहे..
आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्या पार्श्वभूमीवर बोलताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अजित पवारांची स्तुती केली. अजित पवार हे कार्यक्षम मंत्री असून राज्याला त्यांच्यामुळे फायदाच झाल्याचं केसरकर म्हणाले.