Shiv Sena Crisis: शिंदे गटाचा ठाकरे गटाला आणखी एक जबरदस्त झटका,अत्यंत महत्त्वाचे पद जाणार

ठाकरे गटाचं विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे.  शिंदे गटाकडून हालचालींना सुरूवात झाली आहे.

Updated: Feb 20, 2023, 05:19 PM IST
Shiv Sena Crisis: शिंदे गटाचा ठाकरे गटाला आणखी एक जबरदस्त झटका,अत्यंत महत्त्वाचे पद जाणार title=

ShivSenaCrisis and Uddhav Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे  'शिवसेना' (Shiv Sena) हे नाव  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अर्थात शिंदे गटाला मिळाले आहे. या निर्णयामुळे 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे पक्षचिन्ह दोन्ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हातातून गेले आहे. पक्ष आणि चिन्ह मिळवल्यानंतर शिंदे गट ठाकरे गटाला आणखी एक जबरदस्त झटका देणार आहे. अत्यंत महत्वाच्या पदावर ठाकरे गटाला पाणी सोडावे लागणार आहे. ठाकरे गटाची विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते पदावर धोक्याची घंटा आहे.  

चिन्ह आणि पक्षाच्या नाव मिळाल्यानंतर शिवसेनेकडून अर्थात शिंदे गटाकडून ठाकरेंना आणखी एक झटका मिळू शकतो. ठाकरेंचे विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेतेपद घालवण्यासाठी शिंदे गटाकडून हालचाली केल्या जाऊ शकतात. 
विद्यमान शिवसेनेच्या आमदारांपैकी किंवा नवनियुक्त अपक्ष आमदारांपैकी एक सदस्य हा विधानपरिषद सभागृह गटनेते म्हणून नियुक्त होऊ शकतो. एकनाथ शिंदे नियुक्ती करु शकतात. याबाबत  व्हिप जारी केला जाऊ शकतो.

या व्हिपची अंमलबजावणी शिवसेनेतील सर्वच सदस्यांना बंधनकारक राहिल. या व्हिपचे उल्लंघन झाल्यास संबधितांवर व्हिपच्या उल्लंघनाच्या कारवाईचीही मागणी केली जाऊ शकते. विशेष म्हणजे विधानपरिषदेच्या नवनियुक्त गट नेत्याचा आदेशही उद्धव ठाकरेंनाही मान्य करावा लागेल.  त्यामुळे विधान परिषदेतील ठाकरेंचे विरोधीपक्ष नेते पदही धोक्याची घंटा आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पात या घडामोडी घडतात का याकडे लक्ष आहे. 

औरंगाबादचे विधान परिषद आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) हे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते आहेत. ते ठाकरे गटाचे आहेत.  शिंदे गटाकडून शिवसेनेच्या विद्यमान आमदारांपैकी विधानपरिषद सभागृह गटनेते म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. शिंदे गटानं तसा व्हीप जारी केल्यास या हालचालींना वेग येऊ शकतो. येणाऱ्या अर्थसंकल्पात या घडामोडी घडतात का याकडे लक्ष आहे.

 'शिवसेनेच्या 56 आमदारांना व्हीप बजावणार'

आगामी बजेट अधिवेशनात ठाकरे गटाची कोंडी करण्याची रणनीती शिवसेनेनं आखली आहे. शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी व्हीप जारी करणार असल्याचं जाहीर केलंय. शिवसेनेच्या सर्वच आमदारांना हा व्हीप जारी होईल, व्हीप झुगारल्यास निलंबन विचाराधीन असेल गोगावलेंनी म्हंटलंय. तर उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचा दावा खोडून काढलाय. निवडणूक आयोगानं दोन गट मान्य केले असल्यानं आम्हाला कोणताही व्हीप लागू होणार नाही असा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय. संसद अधिवेशनाबाबत संजय राऊत यांनी व्हीप झुगारला तर त्यांचंच निलंबन कसं होईल याची कारवाई आम्ही करणार आहोत असं आमदार संजय शिरसाट म्हणाले.