ED Raid In Vulgar video Racket Case: अभिनेत्री गेहना वशिष्टला नुकतेच सक्तवसुली संचलनालयाने समन्स पाठवले होते. अश्लील चित्रपटांच्या वितरणासंदर्भातील प्रकरणामध्ये आणि पर्यायाने मनी लॉन्ड्रींग प्रकरणात सहभाग असल्यासंदर्भात चौकशीसाठी हे समन्स पाठवण्यात आले होते. गेहनाबरोबरच अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राही या प्रकरणामध्ये रडार खाली आहे. या प्रकरणामध्येच राज कुंद्राला 2021 साली अटक करण्यात आली होती.
सोमवारी सकाळी गेहना ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल झाली होती. यावेळेस तिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तिने आपली बाजू मांडताना ईडीने केलेल्या छापेमारीमध्ये माझ्या घरात कोणत्याही आपत्तीजनक गोष्टी आढळून आलेल्या नाहीत असं या अभिनेत्रीने स्पष्ट केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना गेहनाने, "29 तारखेला माझ्या घरावर धाड पडली आणि सर्व गोष्टींची तपासणी करण्यात आली. माझ्या घरात कोणतेही आपत्तीजनक सामना सापडलं नाही. तसेच कोणत्याही वस्तू आढळू नआलेल्या नाहीत. माझी खाती गोठवण्यात आली आहेत. यामध्ये माझी म्युचुअल फंड्सची आणि एफडी खात्यांबरोबरच सर्वच खात्यांचा समावेश आहे. मला एमपीएलए कलमांअंतर्गत नोटीस पाठवण्यात आली आहे," असं म्हणाली.
पुढे बोलताना या अभिनेत्रीने, "मी तपासामध्ये सहकार्य करण्यासाठी आले आहे. सत्य लोकासंमोर यावं असं माला स्वत:ला वाटत आहे. मी राज कुंद्राला आजपर्यंत केवळ एकदाच भेटले आहे," असं सांगितलं आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, राज कुंद्राच्या आधीच्या कर्मचाऱ्यांचे अश्लील आणि आक्षेपार्ह व्हिडीओ काढण्यामध्ये गेहनाचा सहभाग होता, असा आरोप करण्यात आला आहे. हेच व्हिडीओ नंतर मोबाईल अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून इंटरनेटवर अपलोड करण्यात आल्याचं सांगितलं जातं.
#WATCH | Mumbai, Maharashtra: Actress Gehana Vasisth reaches ED Office
She says, "On the 29th, my house was raided and everything was checked. No objectionable material was found in my house. Nor was any material found. My account was frozen, including my mutual funds, FDs,… pic.twitter.com/cBz2VZR20S
— ANI (@ANI) December 9, 2024
नोव्हेंबर 2024 रोजी ईडीने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या मालकीच्या अनेक संपत्त्यांवर छापेमारी केली. सध्या ईडीने पॉर्न आणि अश्लील व्हिडीओंसंदर्भातील प्रकरणांमधील मनी लॉन्ड्रींगसंदर्भातील तपास हाती घेतला आहे. याच तपासाचा हा भाग आहे.
या छापेमारीनंतर कुंद्राने एक पत्रक जारी केलं होतं. या पत्रकामध्ये आपण तपासात पूर्ण सहकार्य करतोय असं सांगण्यात आलेलं. तसेच त्याने या प्रकरणात प्रसारमाध्यमे शिल्पाचा उल्लेख करत असल्यावरुन नाराजी व्यक्त केली होती.