कोल्हापूर : अपघात झाल्यानंतर जाब विचारणाऱ्या महिलेची छेड काढण्यात आली. अपघात करणारी व्यक्ती एवढ्यावर न थांबता या महिलेला शिवीगाळही केली. इतकचं नाही तर जुना वाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायला गेलेल्या या महिलेची तक्रारही नोंदवण्यात आलेली नाही.
एनसीआर नोंदवून धमकावण्यात आल्याचा आरोप या महिलेने केलाय. कन्हेरकर नगरमधली महिला रंकाळा स्टॅन्डवरून घरी जात असताना एका वाहनचालकाने त्यांच्या गाडीला धडक दिली. त्या खाली पडल्या. त्यामुळे त्यांनी वाहनचालकाला जाब विचारला. यामुळे या वाहनचालकानं महिलेचा हात धरुन तिच्याशी असभ्यपणे वर्तन करुन शिवीगाळ केली.
या घटनेनंतर संबधित महिला तात्काळ जुना राजवाडा पोलीसांकडे एफआयआर नोंदविण्यासाठी गेल्या. पण तिथेही एनसीआर नोंदवून त्यांना धमकावण्यात आले आहे. शिवाय इथे महिला पोलीसही नव्हत्या. पीडित महिलेचा भाऊ मुंबईमध्ये पोलीस उपनिरिक्षक आहे. मात्र, असे असतानाही या महिलाल जर पोलिसांकडून अशी वागणूक मिळत असेल तर सामान्यांचं काय असा सवाल या महिलेनं उपस्थित केलाय.
पीडित महिलेने आता कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली आहे.