नागपुरात दीक्षाभूमीवर जाणाऱ्या कारला अपघात; ४ जागीच ठार

नागपूर येथील दीक्षाभूमीवर जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात ४ जण जागीच ठार झालेत. तर ७ जण जखमी झालेत. देवळी मार्गावरील सेलसुराजवळ रात्री दोन वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

Updated: Sep 30, 2017, 03:03 PM IST
नागपुरात दीक्षाभूमीवर जाणाऱ्या कारला अपघात; ४ जागीच ठार title=

वर्धा : नागपूर येथील दीक्षाभूमीवर जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात ४ जण जागीच ठार झालेत. तर ७ जण जखमी झालेत. देवळी मार्गावरील सेलसुराजवळ रात्री दोन वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

 ट्रॅव्हल्सची ट्रॅक्सला धडक होऊन हा अपघात झाला. नांदेड येथून नागपूरच्या दीक्षाभूमीवर जाणाऱ्या कारला ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली. या अपघातात क्रूजरमधील चार भाविकांचा जागीच मृत्यू झालाय.