गर्भपाताच्या गोळ्यांची अवैध विक्री : आताची सर्वात मोठी बातमी...गर्भपाताच्या गोळ्यांबाबत (abortion pills) धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉक्टरची चिठ्ठी नसली तरी या शहरात गर्भपाताच्या गोळ्या सर्रास मिळतायत. महिला गुपचूप या गर्भपाताच्या गोळ्या घेत असल्याने त्या आपल्या जीवाशी खेळ करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय अशा गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्यामुळे अतिरक्तस्त्रावामुळे दररोज दोन महिला अत्यवस्थेत रुग्णालयात दाखल (women come to the hospital in emergency condition) होतं आहेत.
गर्भपाताच्या गोळ्या या डॉक्टरांच्या (Doctor) सल्ल्याशिवाय घेणे धोकादायक आहे. या गोळ्या घेताना डॉक्टरांच्या देखरेखेखाली घ्यावा लागतात. पण या शहरात बेकायदेशीरपणे गर्भपाताच्या गोळ्या विक्रीच्या रॉकेट सुरु आहे. (abortion pills secretly taking women nmp)
संभाजीनगरमधील (Sambhajinagar) (औरंगाबाद-Aurangabad) ही धक्कादायक घटना आहे. संभाजीनगरमध्ये गर्भपाताच्या गोळ्यांची मोठ्या प्रमाणात अवैध विक्री केली जातं आहे. शहरातील घाटी सरकारी रुग्णालयात दररोज दोन महिला अत्यवस्थेत दाखल होतं आहे. गुपचूप गोळ्या घेतल्यामुळे अति रक्तस्त्राव आणि अर्धवट गर्भपात झालेल्या महिला रुग्णालयात येतं आहेत. संभाजीनगरच्या घाटी शासकीय रुग्णालयानंच (Ghati Government Hospital) हे निरिक्षण नोंदवलंय. त्यामुळे गर्भपाताच्या गोळ्यांच्या अवैध विक्रीचा धंदा (Illegal selling business) जोरात सुरु असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.