Sharad Pawar : 'कोण म्हटलं... मी म्हातारा झालोय?', भर कार्यक्रमात शरद पवारांनी घेतली फिरकी!

Sharad Pawar  : एका कार्यक्रमात बोलताना एका शेतकऱ्याने शरद पवार यांना बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला अन्...

Updated: Oct 24, 2022, 07:13 PM IST
Sharad Pawar : 'कोण म्हटलं... मी म्हातारा झालोय?', भर कार्यक्रमात शरद पवारांनी घेतली फिरकी! title=

Sharad Pawar: शरद पवार म्हणजे राज्यातील राजकारणातील (Maharashtra Politics) न पुसला जाणारा धडा... अनेकांचं वय नसेल इतकी वर्ष शरद पवार राजकारणात आहेत. वयाची ऐंशी पूर्ण केली तरी ते अजूनही ते सात्त्याने दौऱ्यावर असतात. वाढत्या वयोमानानुसार अनेक कार्यकर्ते आणि आमदार शरद पवारांना आराम करण्याचा सल्ला देत आहेत. मात्र, शरद पवार (Sharad Pawar) आपली आवड जपतात आणि पायाला भिंगरी लावून राज्यभर प्रवास करताना दिसतात. अशातच आता सोमवारी पुण्यातील एका कार्यक्रमात एक किस्सा घडला.

नेमकं काय झालं?

शरद पवार पुरंदर तालुक्याच्या (Sharad Pawar In Purandar) दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पवारांनी पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी एका कार्यक्रमात बोलताना एका शेतकऱ्याने शरद पवार यांना बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला. त्यावर शरद पवारांनी उत्तर दिलं.

काय म्हणाले शरद पवार ?

जेजुरीच्या सहकऱ्यांनी सांगितलं, बाहेर फिरु नये. त्यांना वाटतं मी म्हातारा झालो. कुणी सांगतिलं मी म्हातारा झालो, तुम्ही काय बघितलं? मी म्हातारा झालो नाही, असं म्हणताच कार्यक्रमात एकच हशा पिकल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर शरद पवारांना देखील स्वत:च्या वक्तव्यावरून हसू आवरलं नाही. त्यावेळी त्यांनी भाजपवर देखील निशाणा साधला.

आणखी वाचा - मंत्र्यांना चिखलात बुडवून बाहेर काढल्यावर ओला दुष्काळ जाहीर करणार का?

दरम्यान, 1978 साली मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा खेड्यापाड्यात मोठा दुष्काळ होता. तेव्हा 15 दिवसांत मी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलेत. ज्यावेळी माझ्याकडे केंद्राची जबाबदारी होती. त्यावेळी 72 हजार कोटींचे शेतकरी कर्ज माफ केलं होतं, अशी आठवण शरद पवारांनी भाजपला करून दिली.