सागर आव्हाड, झी मीडिया: अंधश्रद्धा किती टोकाचा निर्णय घ्यायला लावू शकते याचीच एक धक्कादायक घटना राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात (pune) घडली आहे. करनी केल्याच्या संशयावरून सख्या दिराने आपल्या भावजयचा गळा चिरून खून केल्याची संतापजनक पुण्यातील चंदननगर परिसरात घडली आहे. चंदननगर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत सूत्र फिरवत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. लक्ष्मीबाई श्रीराम ( वय - 54 रा. बिडीकामगार वसाहत ) असे मयत भावजयचे (Brother in law) नाव असून श्रीनिवास श्रीराम ( रा. बिडीकामगार वसाहत ) नामक दिराला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या घरावर करनी केल्याच्या संशयावरून व आपल्या आईला (Mother) भेटू न देण्याच्या रागातून आरोपी दिराने भावजयचा भर दिवसा गळा चिरून खून केला आहे. या प्रकरणी सागर रमेश दासा ( वय 39 रा. वडगाव शेरी ) यांनी फिर्याद दिली आहे. (a woman badly attacked by her husbands brother)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत यांच्या दीर-भावजयच नातं होतं. हे अगोदर बिडी कामगार वसाहतीत राहत होते, नंतर किरकोळ वादानंतर ते वेगळे राहायला लागले. आई तुळजाभवानीची परडी घेऊन ही महिला जोगवा मागत होती. वडगावशेरी येथे एका ठिकाणी परडी भरण्याचा कार्यक्रम होता. म्हणून या मयत महिलेला बोलवून घेण्यात आलं. त्या ठिकाणी मयत लक्ष्मीबाई गेल्या असता तिथे आरोपी श्रीनिवास देखील आला. त्याने कार्यक्रम असलेल्या घरच्या लोकांना बाकीचे सामान आणण्यासाठी तुम्ही बाहेर जावा असे सांगितलं.
त्यानंतर श्रीनिवास यांने लक्ष्मीबाई यांचा गळा चिरून खून केला. त्या खोलीमध्ये दोघेच असल्याने दुसरे कोणीही तिथे नव्हता असे पोलिसांकडून (Crime news in marathi) सांगण्यात आलं आहे. वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी आरोपीचे लोकेशन ट्रॅक करत घटनेच्या दोन तासात ताब्यात घेतल असून पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये (Crime news) जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आहे. तरीदेखील करनी, जादूटोणा यांसारख्या घटनांचं गारुड काही कमी होताना दिसत नसून यातूनच टोकाची गुन्हेगारी जन्म घेताना दिसत आहे. त्यामुळे पुरोगामित्वाचा कितीही धिंडोरा पिटवला तरी यासाठी समाजप्रबोधन करण्याची खरी गरज या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवू लागली आहे.