Nashik News: चोरट्याने जीव धोक्यात घालून 200 केव्हीचा खतरा असताना केलं भलतंच धाडस

Nashik News: आत्तापर्यंत आपण रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने, गाड्यांच्या चोरीच्या बातम्या बघितली असून येवल्यात मात्र चोरट्याने आपला जीव धोक्यात घालून भलतंच धाडस केलं आहे. 

Updated: Dec 4, 2022, 04:21 PM IST
Nashik News: चोरट्याने जीव धोक्यात घालून 200 केव्हीचा खतरा असताना केलं भलतंच धाडस  title=

चेतन कोळस, झी मीडिया, नाशिक: आत्तापर्यंत आपण रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने (jewels), गाड्यांच्या चोरीच्या बातम्या बघितली असून येवल्यात मात्र चोरट्याने आपला जीव धोक्यात घालून शहरातील नांदूर रोडवर असलेल्या महावितरण कंपनीच्या (mahavitaran) 200 केव्हीच्या ट्रान्सफार्मर मधून वापरल्या जाणाऱ्या महागड्या 300 लिटर आईल ची मध्यरात्रीच्या दरम्यान चोरी केल्याची घटना घडली सकाळी शहरातील इतर भागात लाईट असून आपल्याकडे लाईट नसल्याची तक्रार नांदूर रोड (nashik news) परिसरातील नागरिकांनी दिली यावेळी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बघितल्यावर चालू ट्रान्सफार्मर मधून आईल चोरी (robbed) झाल्याने लाईट गुल झाल्याची बाब समोर आल्याने या कर्मचाऱ्यांना चोरट्यांच्या या कृतीमुळे जणू झटका बसला याप्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आणि विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहे. (a thief tries to steal oil from 200 kv transformer)

शेतकरीही आक्रमक? 

येवला तालुक्यातील पाटोदा, शिरसगाव लौकी, दहेगाव पाटोदा, लौकी शिरस आणि वळदगाव या गावातून भोईसर ते औरंगाबाद पॉवर ग्रिडची टॉवर (power) आणि वाहिनी गेली आहे सन 2015 पासून टॉवर वाहिनीच्या पट्ट्याखाली जमिनीवरील नुकसान भरपाई व मोबदला अद्यापपर्यंत मिळाला नसल्याने तो व्याजासह मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी येवला उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊ मागणी केली तातडीने कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी बाधित शेतकऱ्यांनी (farmers) दिला. 

हेही वाचा - Chandrapur News: 4 बछडे दगावले, मात्र आई कोण हेच माहिती नाही...

7 वर्षापासून विद्युत जोडणी न दिल्याने जनरेटर लावून पिकांना पाणी देण्याची वेळ

7 वर्षापासून कोटेशन भरूनही विजपुरवठा होत नसल्याने शेतकऱ्याला जनरेटर लावून शेताला पाणी देण्याची वेळ आलीये. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील हा प्रकार आहे. बावलगाव येथील रवी राजाराम तळणे यांनी शेतातील विंधन विहिरीला विज पुरवठा (power supply) व्हावा यासाठी जानेवारी 2015 मध्ये विद्युत वितरण कंपनीकडे रितसर कोटेशन (quotation) भरले होते. 6 हजार 300 रुपये त्यांनी भरले. कोटेशन भरून तब्बल सात वर्ष झाले तरी विद्युत वितरण कंपनीच्या वतीने शेतातील विद्युत पंपाला विज पुरवठा अद्याप दिला नाही. त्यामुळे नाईलाजाने रब्बी हंगामातील पिकाला किरायाने जनरेटर आणून पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. किरायाचे जनरेटर व त्याला लागणाऱ्या इंधनामुळे (fuel) अधिकचा फटका शेतकऱ्याला बसतोय. तळणे यांच्याप्रमाणे अनेक शेतक-र्यांनी कोटेशन भरले आहेत. मात्र त्यांना वीज जोडणी देण्यात आली नाही. त्यामुळे महावितरणच्या गलथान कारभाराबाबत रोष व्यक्त केला जात आहे.