पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर: पैसा कमावण्याची इच्छा सर्वांनाच असते. त्यामुळे आपण गैर किंवा चांगल्या मार्गानं पैसे कमवण्याच्या उद्देशानं पुढे जात असतो. सध्या अशाच एक प्रकार घडला आहे ज्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे. सध्या आजूबाजूला अनेक धक्कादायक प्रकार हे घडत असतात. सध्या अशाच एका प्रकारानं सगळीकडेच खळबळ (Shocking News) माजवून दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेसंबंधीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. (a group of three men resells grains received from ration to earn money)
नागपुरात रेशन धान्य खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या तिघांना तहसील पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये300 पोते धान्य जप्त केलेले आहे. दुचाकीवरून धान्य घेऊन जाताना पोलिसांना एका तरुणावर संशय आला. विचारपूस केली असतां यात रेशनचे धान्य वस्त्यांमधून खरेदी करून मांजरी परिसरात गोडाऊनमध्ये जमा करत असल्याचे सांगितले. हेच धान्य नंतर मोठ्या विक्रेत्याना विकत असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली. यामाहितीच्या आधारे गोडाऊनवार धाड टाकून गहू तांदूळ धान्यासह 4 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये अकबर खान इब्राहिम खान (46), तनवीर शेख शब्बीर शेख (23), अभय कुंडलिक डायरे (21) अटकेतील तिघांचे नाव असून कैफ बिल्लू फरार झाला असून तहसील पोलीस त्याचा शोध घेत आहे.
रेशनिंगमुळे (Ration Card news Today) अनेक गरजू लोकांना त्याचा चांगला फायदा होता आहे. आता अनेक ठिकाणी रांगा लावण्यापेक्षा रेशन घेताना अनेकांनी बायोमेट्रिक (Biometric) प्रणालीद्वारे रेशनिंगमार्फत वस्तू घेण्यास सुरूवात केली आहे. बायोमेट्रीक तंत्रज्ञानामुळे आता सगळंच सोयीस्कर झालं आहे. परंतु अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे कधीकधी लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सध्या अशाच एक प्रकार समोर आला आहे. सर्वर डाऊन असल्याने बायोमेट्रिक प्रणालीत बिघाड झाला आणि त्यामुळे अनेकांना रेशन मिळेनासे झाले.
पुणे जिल्ह्याच्या सणसवाडी येथील सरकारमान्य स्वस्त धान्य वितरण दुकानात नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्यामुळे वितरक आणि नागरिकांमध्ये वाद पहिला मिळाला आहे. नागरिकांचे बायोमॅट्रिक दोन तीन वेळा करावा लागत आहे. त्यामध्ये बायोमॅट्रिक सर्व्हर डाउन (Server Down) असल्यामुळे नागरिकांना धान्य असून सुद्धा मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे उन्हातान्हात त्रास सहन करावा लागत आहे. सरकारच्या या डिसाळ कारभारमुळे महिन्याचं धान्य आणि दिवाळीचा आनंदाच्या शिधा पासून वंचित राहावे लागत आहे.