Accident Near Saptashrungi: वर्षाचा शेवटचा महिना सुरू झाला आहे त्यामुळे भाविक आता देवदर्शनाला गर्दी करत आहेत. अशातच कोरोनानं डोकं वर काढल्यानं आता देवदर्शनाला (Mask Complusory in Mandir) आपल्या भाविकांसाठीही मास्क स्कती करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच चिंतेचे वातावरण पसरले आहे. किंबहूना आता देवदर्शनाला आल्या भाविकांनाही गर्दी आणि इतर गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यातून आता अशीच एक गंभीर बातमी येते आहे. सप्तशृंगीला (Saptashrungi) गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला असून त्यांची गाडी एका बाजूला कोलमंडली आहे. यामध्ये प्रवास करणाऱ्या 30 भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नाशिकच्या सप्तशृंग गडावर दर्शनासाठी आलेल्या पिकअप वाहन कलडूंन झालेल्या अपघाता 32 भाविक किरकोळ जखमी झाले आहे. हे सर्व भाविक मालेगावच्या दाभाडी येथून दर्शनासाठी जात होते. गड अवघा एक किलोमीटर राहिला असतांना चालकाचे नियंत्रण (accident) सुटल्याने हा अपघात घडला.
अपघाताची माहिती कळताच गडावरील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदतकार्य राबवून जखमीना नांदुरी, वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.सर्व जखमींची स्थिर आहेत. हा अपघात नाशिकच्या वणी गडावर झाला आहे. एक गाडी भाविकांना पिकअपसाठी घेऊन आली होती. या गाडीला जोरात धडक लागल्यानं 30 हून अधिक भाविक जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात अडकलेले भाविक मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथले होते व हे भाविक या गाडीनं सप्तशृंगी गडावर जात होते अशी प्राथमिक माहिती कळते आहे. वाहक चालकाचा दाबा सुटला आणि पिकअपनं (Pickup) भाविकांना घेऊन जाणारी हाडी एका बाजूने जोरात पलटली आणि कोसळली. नशिब बलवत्तर होते म्हणून कुठलाही मोठी घटना घडली नाही. कारण या भाविकांना सप्तशृंगी मंदिराला जायला फक्त 1 किलोमीटरचं अंतर होते.
आजूबाजूच्या स्थानिक लोकांच्या मदतीनं या जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जेजुरी (Jejuri) येथे यात्रेकरूंच्या बसचा ब्रेक फेल झाल्याने बस दुकानात शिरली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. एक खाजगी बस पुण्याहून जेजुरी येथे जवळपास 40 यात्रेकरुंना घेऊन येत होती.जेजुरी बस स्थानकासमोरील उतारावर असताना बसचा ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने चालकाने ही बस शेजारील दुकानाला धडकवून थांबवली. बसचा वेग कमी असल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही. पोलीस घटना स्थळी पोचले असून प्रवाशांना मदत करण्यात आली आहे.