मुंबईतून कोकणात पायी जाणाऱ्या ४३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

मुंबई - गोवा महामार्गावरून चालत कोकणात आपल्या गावी निघालेल्या व्यक्तीचा पेणजवळ मृत्यू झाला.  

Updated: May 15, 2020, 10:01 AM IST
मुंबईतून कोकणात पायी जाणाऱ्या ४३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू title=
प्रतिकात्मक छाया

रायगड : मुंबई - गोवा महामार्गावरून चालत कोकणात आपल्या गावी निघालेल्या व्यक्तीचा पेणजवळ मृत्यू झाला. मोतीराम जाधव असं  ४३ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे.  मुंबईतील कांदिवलीतून लहान मुलांसह सात जणांचं कुटुंब श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव या आपल्या गावी निघाले होते. 

रस्त्यात पेण तालुक्यातील जिते गावाजवळ पार्किंग सहारा हॉटेल इथं आले असता मोतीराम जाधव यांचा अचानक मृत्यू झाला. त्यामुळे या कुटुंबावर आभाळ कोसळलंय. जाधव यांचा मृतदेह पेणच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी अशाच चालत निघालेल्या श्रीवर्धनच्या मारळ गावातील सलोनी बांदरे या महिलेचा माणगाव जवळ मृत्यू झाला होता.  मुंबई-गोवा महामार्गावरून दररोज शेकडो मुंबईकर चालत कोकणातील आपल्या गावी निघालेत. त्यांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत.